सोलापूर – सोमवार दिनांक २२ डिसेंबर २०२५ रोजी सोलापूर येथे क्रीडा ज्ञान परीक्षे संदर्भातील दोन पारितोषिक वितरण समारंभ व आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून क्रीडा भारती पश्चिम महाराष्ट्र प्रांत उपाध्यक्ष प्रा शैलेश आपटे सर यांना निमंत्रित करण्यात आले होते.
यानिमित्ताने सकाळी ११ वाजता सोलापूर येथील शिवस्मारक समितीच्या सभागृहात, सोलापूर येथे क्रीडा भारतीचे वतीने सुरू असलेल्या १२ क्रीडा केंद्रप्रमुख प्रमुख आणि प्रशिक्षक यांचे सोबत एक बैठक आयोजित करण्यात आली होती. सोलापूर शहराच्या विविध भागांमध्ये फुटबॉल, कबड्डी, कुस्ती,लाठीकाठी अशा अनेक खेळांमध्ये एकूण बारा क्रीडा केंद्र चालविण्यात येतात. सर्व क्रीडा केंद्रांमध्ये मिळून जवळजवळ ४५० विद्यार्थी नियमित सराव करीत असतात. या बैठकीत प्रथम सर्व प्रशिक्षकांची त्यांचा परिचय करून दिला.त्यानंतर त्यांच्या केंद्रावर सुरू असलेल्या ऍक्टिव्हिटी विषयी त्यांनी संपूर्ण माहिती सांगितली. शैलेश आपटे यांनी क्रीडा केंद्र कसे चालवावे, त्यात कोणती काळजी घ्यावी याविषयी त्यांना मार्गदर्शन केले.
श्री सिद्धेश्वर वुमन्स पॉलिटेक्निक
दुपारी १.३० वाजता श्री सिद्धेश्वर वुमन्स पॉलिटेक्निक कॉलेज या ठिकाणी त्या महाविद्यालयातल्या ज्या विद्यार्थिनी क्रीडा ज्ञान परीक्षेला बसलेल्या होत्या त्या विद्यार्थिनींपैकी पहिल्या तीन क्रमांकाच्या विद्यार्थिनींना व महाविद्यालयाला स्मृतीचिन्ह देण्यासाठी महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी सुमारे दीडशे विद्यार्थिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी *प्राचार्य गजानन धरणे सर* उपस्थित होते. या महाविद्यालयातून सुमारे १५० विद्यार्थीनि यांनी या परीक्षेसाठी त्यांचा सहभाग नोंदविलेला होता.
*श्री शैलेश आपटे* यांनी त्यांच्या निवेदनामध्ये क्रीडा भारती करीत असलेल्या क्रीडा क्षेत्रातील कार्याची माहिती उपस्थितांना दिली आणि पुढील वर्षी महाविद्यालयातील सर्व ११०० विद्यार्थिनींनी या परीक्षेसाठी सहभाग नोंदवावा असे आवाहन केले,आणि या आवाहनास प्राचार्य धरणे सर यांनी त्यांच्या संभाषणात संमती देऊन पुढील वर्षी आमच्या सर्व विद्यार्थिनींना आम्ही या परीक्षेसाठी बसवू असं आश्वासित केले.
*एस इ एस पॉलीटेक्निक*
दुसरा कार्यक्रम दुपारी ३.३० वाजता एम इ एस पॉलीटेक्निक इंजिनिअरिंग कॉलेज या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे *उपप्राचार्य पाटील* सर व संचालक मंडळातील सदस्य *श्री देवगावकर साहेब* हे उपस्थित होते. या महाविद्यालयातील *कुमारी ओवी शिंदे* यांनी क्रीडा ज्ञान परीक्षेतील तृतीय क्रमांकाचे *रुपये २५ हजार* चे पारितोषिक मिळवले होते. याचा पारितोषिक वितरण समारंभ या महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये करण्यात आला. या समारंभासाठी देखील महाविद्यालयातील १०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी उपस्थित होत्या.
दोन्ही कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने आयोजित करण्यात आले होते या सर्व कार्यक्रमांना सोलापूर क्रीडा भरतीचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सायंकाळी सहा वाजता सक्षम महिला अभियाना अंतर्गत लाठी काठी क्रीडा केंद्राचे उद्घाटन शिवस्मारक च्या क्रीडांगणावर प्राध्यापक शैलेश आपटे यांच्या शुभहस्ते करण्यात आले . या क्रीडा केंद्रावर एकूण ३५ विद्यार्थी विद्यार्थिनींनी नोंदणी केलेली आहे. वरील सर्व कार्यक्रमांसाठी क्रीडा भारती पश्चिम महाराष्ट्र चे मंत्री श्री ज्ञानेश्वर माकल व सोलापूर जिल्हा कार्यकारणीतील सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
























