सांगोला – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अर्थशास्त्र परिषदेच्यावतीने दिला जाणारा अर्थशास्त्र जीवनगौरव पुरस्कार सांगोला महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्रा.डॉ.भगवंत हनुमंत कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आला.
डॉ.कुलकर्णी यांनी सांगोला महाविद्यालयात अनेक वर्षे अर्थशास्त्र विषयाचे अध्यापन केले असून अर्थशास्त्र क्षेत्रातील त्यांचे प्रदीर्घ योगदान, संशोधन आणि शैक्षणिक कार्याची दखल घेऊन विद्यापीठ अर्थशास्त्र परिषदेने त्यांना या पुरस्काराने गौरविले आहे. याबद्दल डॉ.कुलकर्णी यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.

























