येरमाळा प्रतिनीधी (सुधीर लोमटे ) – येरमाळा येथील प्रा . संतोष तौर संस्थापक असलेल्या जनहित पतसंस्थेला महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन कडून सलग तिसऱ्या वर्षी दिपस्तंभ पुरस्कार जाहीर झाला आहे.
जनहित पतसंस्थेला २०२४ चा छत्रपती संभाजीनगर विभागातून १० कोटी ते ३० कोटी गटातून प्रथम क्रमांक मिळाला आहे. हा पुरस्कार महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन मुंबई यांच्या कडून दिला जातो.जनहित पतसंस्था २००५ पासुन म्हणजे गेल्या २० वर्षा पासुन येरमाळा व पंचक्रोशीत आर्थिक व्यवहारात कार्य करीत आहे. आज पर्यत संस्थेला उत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे सहकाररत्न बॅको कर्णाडबॅकिंग पासुन फेडरेशनचा सलग तिसऱ्यांदा दिपस्तंभ पुरस्कार मिळाला आहे .
सदरील पुरस्कार राज्यस्तरीय असुन याचे वितरण रामोजी फिल्मसिटी हैद्राबाद येथे दि ३ व ४ ऑगस्ट रोजी प्रदान करण्यात येणार आहे.
या यशाबदल संस्थापक प्रा. संतोष तौर,चेअरमन श्रुती माशाळकर व्हाइस चेअरमन नितिन कवडे सचिव दत्ता रणसिंग संचालक बळीराम नवले,गोवर्धन उगडे,रामकिसन कोकाटे,गणेश मोरे,सुनिल शिंदे अंकुश भगत,संगीता जाधवर व्यवस्थापक शिवप्रसाद घेवारे संस्थेचे कायदे विषयक सल्लागार ॲड व्ही के माने साहेब व ॲड महेंद्र कासार साहेब मार्गदर्शक वल्लभ माशाळकर कर्मचारी समाधान भगत अभिजीत पाटील रमेश बारकुल पवन ओव्हाळ निशांत कांबळे रोहीत घेवारे निकीता वेदपाठक जिवन जाधव यांच्या सह सर्व खातेदार ठेविदार सभासद व्यापारी उद्योजक व समस्त गावकरी यांनी जनहीत परिवाराचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत .