मुंबई – राज्यात महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर आता जिल्हा परिषद निवडणुकांची घोषणा झाली आहे. मात्र, जिल्हा परिषद निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी जोर धरत आहेत.या मागणीसाठी धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी चक्क येथील राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाऊन ठिय्या आंदोलन केले.’ईव्हीएम हटाव देश बचाओ, अशी जोरदार घोषणाबाजी केल्याने कार्यालयात काहीकाळ मोठा गोंधळ उडाला. इमारतीच्या परिसरात बंदोबस्ताला असलेल्या सुरक्षारक्षकाची धावपळ उडाली. पोलिसांना पाचरण करून 5 जणांना ताब्यात घेतले.
विधानसभा, नगरपालिका आणि आता महापालिका निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळाल्याने विरोधकांनी पुन्हा एकदा ईव्हीएम मशिनचा मुद्दा उपस्थित करत बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी होत आहे.त्यासाठी विविधस्तरावर आंदोलन करण्यात येत आहे.
आज धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठानचे महिला अध्यक्षा राजश्री उंबरे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयात गेले. तेथे ठिय्या मारीत त्यांनी ईव्हीएम विरोधात घोषणाबाजी सुरु केली. ईव्हीएम हटाव देश बचाओ अशी घोषणा सुरु केल्या. त्यांच्या या आकस्मित कृत्यामुळे कार्यालयात मोठा गोंधळ उडाला. चांगलाच गोंधळ उडाला. कार्यालयातील सुरक्षा रक्षकांनी पोलिसांना पाचारण केले.
ईव्हीएमवर बंदी घालावी, सत्ताधारी ईव्हीएमचा वापर करुन निवडणूक जिंकत असल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी कार्यलयात गोंधळ घातला. तसेच, निवडणूक आयोग आमच्या तक्रारींची दखल घेत नाही, असेही त्यांनी म्हटलं.
ईव्हीएमवर बंदी घालावी, सत्ताधारी ईव्हीएमचा वापर करुन निवडणूक जिंकते. निवडणूक आयोग आमच्या तक्रारींची दखल घेत नाही, ईव्हीएम हटविण्याच्या मागणीसाठी उपोषण सुरू असून उपोषणकर्ते बाळराजे आवारे यांच्या समर्थनार्थ आम्ही आज आंदोलन केले,असे राजश्री उंबरे -पाटील यांनी यावेळी सांगितले.


























