जेऊर – राष्ट्रीय किसान दिनानिमित्त शेटफळ (ता करमाळा) येथील लोकविकास फार्मर प्रोड्युसर कंपनी व नागराज पीव्हीसी पाईप कंपनी यांच्यावतीने” नागराज दिनदर्शिका 2025″ चे प्रकाशन युनियन बँकेच्या चिखलठाण शाखेचे सहव्यवस्थापक सिद्धेश्वर शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना सहव्यवस्थापक शिंदे म्हणाले की शेती व्यवस्थापनात नियोजन महत्त्वाचे असून शेतकऱ्यांनी खते, बियाणे, मशागतीसाठी होणारा व इतर आपल्या दैनंदिन खर्चाच्या नोंदी ठेवणे व शेतीतील कामाचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. यासाठी दिनदर्शिका महत्त्वाची असून या नियोजनासाठी दिनदर्शिकेचा आधार घेतला पाहिजे.
गेल्या आठ वर्षापासून लोकविकास फार्मर प्रोड्युसर कंपनी नागराज ठिबक अँड पीव्हीसी पाईप कंपनी व नागरा शेतकरी मॉल यांच्या वतीने दिनदर्शिका प्रकाशित केली जाते या दिनदर्शिका मध्ये शेतकऱ्यांसाठी उपयुक्त माहिती वार तिथी सण उत्सव महत्त्वाच्या नोंदी परिसरातील यात्रा उत्सव यांची माहिती दिलेली असते.
गेल्या आठ वर्षापासून परिसरातील शेतकरी व गरजूंना ती मोफत वितरित केली जाते यावर्षीही या दिनदर्शिकेचे प्रकाशन युनियन बँकेच्या चिकलठाण शाखेचे सभा व्यवस्थापक सिद्धेश्वर शिंदे शिरपूरचे माजी सरपंच मुरलीधर पोळ लोकविकास फार्मर प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष वैभव पोळ नानासाहेब साळुंके, विष्णू पोळ,विजय लबडे प्रशांत नाईकनवरे ,गजेंद्र पोळ राजेंद्र साबळे यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली यावेळी गणेश मोरे गंगाधर पोळ,बाबुराव पोळ ज्ञानेश्वर पोळ, गणेश पोळ,उमेश घोगरे श्रीकृष्ण लबडे महादेव पोळ हनुमंत जाधव लहू पोळ सिताराम मोरे सुधिर पोळ , सुनील वळेकर यांच्यासह ग्रामस्थ व सभासद शेतकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते

























