अंबड घनसावंगी तालुक्यात पावसाचा खंड; खरीप पिके तहानली
तभा वृत्तसेवा अंबड प्रतिनिधी बाळासाहेब गावडे
अंबड घनसावंगी तीर्थपुरी, दि. ६ – यंदा वेळेवर आलेल्या, पावसामुळे तीर्थपुरी व परिसरातील शेतकऱ्यांनी पेरणीला वेग दिला होता. यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा पेरण्या लवकर पूर्ण झाल्या आहेत. पिकेही चांगली तरारली आहेत.
मात्र, पावसामध्ये मोठा खंड पडला आहे. दरवर्षी उशिराने दाखल होणारा मान्सून यावर्षी मात्र वेळेवर
* दाखल झाला. तत्पूर्वी मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली होती. १० जून रोजी मान्सूनचा पाऊस पडला. चांगल्या पावसामुळे शेतकरी बांधवांनी – पेरण्याही उरकल्या. परंतु १० जूननंतर मन पडलेल्या पावसामुळे पिके
प्रतीक्षा लागलेली आहे. विहीर, बोअर आदीची पाणी पातळी जेमतेमच असल्याचे दिसून येत आहे. ‘तालुक्यातील मच्छिन्द्र चिंचोली, मांदळा, राजेगाव परिसरात सुरुवातीलाच जोरदार पाऊस पडल्याने त्या भागातील पाणी पातळी चांगली वाढली. मात्र इतर भागात परिस्थिती जेमतेमच आहे.
तसेच काही किरकोळ पावसाचे अपवाद वगळता पिके उगवून येण्यापुरताच पाऊस पडलेला आहे. सध्या खरिपाची कापूस, सोयाबीन, तूर पिके तहानलेली असून, या पिकांना पाण्याची गरज निर्माण झाली आहे. काही शेतकऱ्यांनी ठिबक तर काहींनी
पावसाने उघडीप दिली असून आभाळ भरून येते; परंतु पाऊस पडत नाही असे चित्र सर्वत्र दिसत आहे. वातावरणातील होणारे बदल, हवेतील आर्द्रतेमुळे खंड पडत असून येत्या आठवड्यात पाऊस पडणार असल्याचे संकेत हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आले. असे असले तरी दररोज सोसाट्याचा वारा सुटत असल्याने आलेले ढग निघून जात आहेत. दरम्यान, तीर्थपुरी परिसरातील शेतकरी पडणाऱ्या पावसाच्या प्रतीक्षेत असले तरी नाशिक भागात जास्त पाऊस पडून पैठण येथील जायकवाडी धरण कधी भरते, याचीच जास्त आस शेतकऱ्यांना लागलेली असते. एकदा का धरण