तभा फ्लॅश न्यूज/सोलापूर : संपादक, माध्यम तज्ज्ञ, राजकीय विश्लेषक आणि प्रतिबिंब प्रतिष्ठान व डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी आज सोलापूरमधील नामांकित अश्विनी हॉस्पिटलला सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान संस्थेचे संस्थापक बिपिनभाई पटेल यांनी आरोग्यसेवा आणि आरोग्य शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याचा त्यांनी विशेष गौरव केला.
या वेळी अश्विनी संस्थेचे व्हाईस चेअरमन विजय पाटील, संचालक सी. एस. स्वामी आणि संचालक अशोक लांबतुरे यांनी राजा माने यांचे स्वागत करत सत्कार केला. आरोग्यसेवा क्षेत्रात एक आदर्श प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अश्विनी हॉस्पिटलच्या माध्यमातून बिपिनभाई पटेल यांनी सामान्यांपर्यंत दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचवली आहे, असे मत राजा माने यांनी व्यक्त केले.
यावेळी डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना सोलापूर जिल्हा समन्वयक राजाराम मस्के तसेच माजी नगरसेवक प्रविण निकाळजे हे देखील उपस्थित होते.
राजा माने यांच्या या सदिच्छा भेटीमुळे अश्विनी संस्थेच्या कार्यास नवीन उर्जा मिळाल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. तसेच, समाजसेवेच्या क्षेत्रात आरोग्य आणि माध्यम यांची समन्वयाने जाणीवपूर्वक वाटचाल होणे काळाची गरज असल्याचा सूर यावेळी उमटला.