अकलूज – येथील रमामाता महिला मंडळ ,रमामाता चौक यांच्या वतीने त्यागमुर्ती माता रमाई यांच्या 128 व्या जयंती निमित्त तीन दिवसाच्या रमाई मोहत्सवाचे आयोजन करुन विविध कार्यक्रमाच्या माध्यमातुन अभिवादन करण्यात आले.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी त्यागमुर्ती रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अकलूज येथील रमामाता महिला मंडळाच्या वतीने ” रमाई मोहत्सव वर्ष 2 रे “आयोजित करण्यात आले होते.यामध्ये आठ दिवस रमाई यांच्या चारित्र्य ग्रंथाचे वाचन करण्या आले तर महीलांनच्या संगीत खुर्ची, प्रश्न मंजुषा,रांगोळी स्पर्धा व निबंध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. दि.6 फेब्रुवारी रोजी लहान मुलींच्या डान्स स्पर्धा पार पडल्या,तदनंतर महीलांनी रात्री 12 वा.पाळणा बांधुन रमाई जन्म उत्सव साजरा केला.
शनिवार दि.7 फेब्रुवारी रोजी सकाळी महामानवाच्या व माता रमाईच्या प्रतिमांचे पुजन करुन वंदना सुत्तपठण घेण्यात आले.सायंकाळी रमामाता महिला मंडळ व आंबेडकरनगर मित्र मंडळ यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माता रमाईच्या प्रतिमेची अकलूज शहरातुन भव्य मिरवणुक काढण्यात आली होती यावेळी अकलूज व परीसरातील आंबेडकर अनुयायी सहभागी झाले होते.

























