नायगांव / नांदेड – विद्युत कामगारांच्या आर्थिक सबलीकरणासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या नांदेड विज कामगार को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची निवडणूक नांदेड येथे अत्यंत उत्साह व सकारात्मक वातावरणात पार पडली. या निवडणुकीत सर्व सदस्यांचा विश्वास संपादन करत रमेश गोविंद वडगांवे नरसी कर यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
सहकार क्षेत्रातील अनुभव, कामगार हिताची स्पष्ट भूमिका आणि संघटनात्मक नेतृत्वगुण यामुळे वडगांवे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा सहकारी संस्था निबंधक के. एस. बरकुल, सहाय्यक निबंधक (पी) व जिल्हा उपनिबंधक, नांदेड यांच्या उपस्थिती मध्ये करण्यात आली.
याचवेळी कैलाश राऊत यांची उपाध्यक्षपदी तर सतीश वाघमारे यांची मानद सचिवपदी बिनविरोध निवड झाली. निवडणुकीचे निकाल जाहीर होताच सभागृहात टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला आणि उपस्थितांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांवर मोठ्या आनंदाने शुभेच्छांचा वर्षाव केला.
या निवडणूक प्रक्रिये वेळी अविनाश रामगिरवार, ईश्वरसिंह टेलर, धोंडीबा गोत्रम, सतीश निशंकर, बालाजी स्वामी,राजेश सोनकांबळे,सचिन सोनसले, संचालक राजनंदिनी सोनकांबळे यांची विशेष उपस्थिती होती.
तसेच कार्यालय अधीक्षक प्रकाश देशमुख, संघटनेचे ज्येष्ठ नेते पंडित तेलंग, हरप्रीतसिंग तब्बेवाले, श्रीकांत राठोड, लक्ष्मीकांत चनापुरे, किरण डर्नासे, महेश चांदोलकर, माधव गोरकावड, बालाजी कदम यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
नांदेड विज कामगार को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या कार्यालयात पार पडलेली ही निवड णूक प्रक्रिया ही आनंदी वातावरणात संपन्न झाली. रमेश वडगांवे यांच्या सक्षम नेतृत्वाखाली संस्था अधिक सक्षम, पारदर्शक व प्रगतीशील वाटचाल करेल, असा विश्वास यावेळी उपस्थित सदस्यांनी व्यक्त केला.

















