तभा फ्लॅश न्यूज/बारामती : महावितरणकडून सार्वजनिक गणेश मंडळांना तात्पुरत्या स्वरूपात व त्वरित वीजजोडणीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. या जोडणीसाठी घरगुती वीजदर आकारण्यात येणार आहेत. तरी सार्वजनिक गणेश मंडळांनी अधिकृत वीज जोडणी घ्यावी. भाविक भक्तांच्या सुरक्षेसाठी मंडप, विद्युत रोषणाई व देखाव्यांची उभारणी करताना विद्युत सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करावे,असे महावितरणचे आवाहन आहे.
आपात्कालीन स्थितीकरिता कार्यक्षेत्रातील महावितरणच्या स्थानिक शाखा अभियंत्यांचे मोबाईल क्रमांक नोंदवून ठेवावेत. यासोबतच मंडलस्तरीय नियंत्रण कक्षांचे 7875768074 (बारामती मंडल), 9029168554 (सातारा मंडल), 9029140455 (सोलापूर मंडल) तसेच मध्यवर्ती ग्राहक सुविधा केंद्राचे टोल फ्री क्रमांक 1800-212-3435, 1800-233-3435, 1912 हे वीजसेवा विषयक तक्रारी व माहितीसाठी ग्राहकांच्या सेवेत 24 तास उपलब्ध आहेत.