Friday, February 13, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

संशोधन प्रकल्पांचा उपयोग समाजासाठी व्हावा – उपप्राचार्या डॉ.मिनाक्षी पवार

तरुण भारतbyतरुण भारत
January 21, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर – ‘आज विज्ञान हा दैनंदिन जीवनशैलीचा एक भाग बनलेला आहे. आपल्या ज्ञानात विज्ञानामुळे अधिक भर पडत असते. विज्ञानाकडे पाहण्याचा दृष्टिकोन जर बदलला तर जीवनात सकारात्मक येते आणि चिकित्सक वृत्ती, जिज्ञासू वृत्ती वाढीस लागते आणि मग आपल्यामधूनच शास्त्रज्ञ, उद्योजक घडत असतात. आपल्या संशोधन प्रकल्पांचा समाजासाठी उपयोग व्हावा तरच आपल्याला त्यातून आनंद घेता येईल.’ असे प्रतिपादन स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअयरिंगच्या उपप्राचार्या डॉ.मिनाक्षी पवार यांनी केले.

राज्य विज्ञान संस्था, रविनगर, नागपूर व शिक्षण विभाग (प्राथमिक व माध्यमिक) जिल्हा परिषद, सोलापूर यांच्या संयुक्त स्वेरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) मध्ये आयोजिलेल्या ‘५३ व्या सोलापूर जिल्हा स्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनी २०२५-२६’ च्या समारोप प्रसंगी स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या उपप्राचार्या डॉ.मिनाक्षी पवार ह्या मार्गदर्शन करत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर जिल्ह्याचे उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रकाश नांगरे हे होते. महाराष्ट्र राज्य विज्ञान महामंडळाचे संचालक लक्ष्मीप्रसाद मोहिते यांनी प्रास्ताविकात ‘स्वेरीमध्ये आयोजिलेल्या विज्ञान व गणित प्रदर्शनासंबंधी माहिती दिली. 

अध्यक्षस्थानावरून बोलताना उपशिक्षणाधिकारी प्रकाश नांगरे यांनी प्रदर्शनामध्ये सहभाग घेतलेल्या सर्व बालवैज्ञानिकांचे कौतुक केले ते म्हणाले ‘जे विजेते ठरले ते मोलाचे आहेत आणि जे उपयोविजिते ठरले ते देखील लाख मोलाचे आहेत. त्यामुळे पुरस्कार मिळाला नाही म्हणून नाराज न होता प्रकल्पामध्ये आणखी जोमाने संशोधन करावे.’ असे सांगून चिमुकल्या हातांनी सादर केलेल्या कल्पक बुद्धिमत्तेचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश लटके यांनी केले तर विद्यार्थ्यांना पुरस्कार देवून या उपक्रमाची सांगता करण्यात आली.
———————


१३२ प्रकल्पांचे सादरीकरण
प्राथमिक, माध्यमिक व शिक्षक गटातून तब्बल १३२ प्रकल्पांचे सादरीकरण केले गेले. यामध्ये बालवैज्ञानिकांमधून अद्भुत, बौद्धिक कल्पनांचे विशेष संशोधन आढळले तर हे प्रदर्शन पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती.प्रा.शितल पाटील, प्रा.एस.डी.माळी, प्रा.एस.एस.गायकवाड, प्रा.पी.बी.लोखंडे, डॉ.एस.डी.भोसले, आदींनी परीक्षकांचे काम उत्तमरित्या पहिले. 
———————–

या प्रदर्शनातून प्राथमिक गटात प्रथम-बसवराज रविकांत तोळनुरे (प्रकल्प-सौर कृषी पंप), द्वितीय-विरोचंद सिद्धेश्वर कराळे (हॅन्ड डेस्टर कार), तृतीय- प्रेमराज आण्णासाहेब शेळके (ट्रान्समिशन लाईन), माध्यमिक व उच्च माध्यमिक गटातून प्रथम -महेश श्रीमंत टेंगळे (स्मार्ट अॅग्रिकल्चर), द्वितीय- आयुब चारुदत्त लाड (स्मार्ट स्कूल) व तृतीय- जुनेद बाग्दावर शेख (ऊमन सेफ्टी अँड मल्टीपर्पज सेफ्टी), दिव्यांग गटातून प्राथमिक गटात प्रथम- सुप्री गजेंद्र शिंदे (जल, संधी, व्यवस्थापन), दिव्यांग गटातून माध्यमिक व उच्च माध्यमिक गटात प्रथम- गणेश महादेव निकम (अंडी उबवणे मशीन), प्राथमिक शिक्षक गटात प्रथम- विशाल विष्णुदास रेपाळ (माझी गणित शाळा), माध्यमिक शिक्षक गटात प्रथम- मंगेश अरविंद सोनटक्के (खेळातून जीएसटी आणि कृतीयुक्त आराखडा), योगशाळा व परिचर गटात प्रथम- शशिकांत हनुमंत शेंडे (निर्मिती वैज्ञानिक संकल्पना स्पष्टीकरण पूरक वैज्ञानिक व शैक्षणिक सहल) हे विद्यार्थी व शिक्षक विजेते ठरले असून त्यांची निवड राज्य पातळीवर झाली आहे.

Post Views: 23
Previous Post

तडीपार आरोपीकडून 14 लाखांचे १११ मोबाईल जप्त

Next Post

कर्णबधिर विद्यार्थिनींला वाढदिवसानिमित्त अनोखी भेट

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

कर्णबधिर विद्यार्थिनींला वाढदिवसानिमित्त अनोखी भेट

ताज्या बातम्या

तीन महिने उलटून गेले तरीही या स्थळ संरक्षणासाठी कोणतीही उपाययोजना झालेली नाही..#viral #solapurnews

February 13, 2026

1 हजार 32 कोटीच्या विकास कामांना मंजुरी.#viral #solapurnews

February 13, 2026

डीबी वुड या 45 मजली इमारतीच्या नवव्या मजल्यावर शुक्रवारी (13 फेब्रुवारी) सकाळी अचानक भीषण आग.

February 13, 2026

इलेक्ट्रिक बसला लागली आग.50 कामगार सुखरूप.#public #marathinews #viral

February 13, 2026

लाडक्या बहिणींना मिळणार एकदम ६००० रुपये..#लाडकी_बहीण_योजना #ladkibahin

February 13, 2026

भारत खरेदी करणार 114 राफेल विमान#public #trendingshorts

February 13, 2026

पुण्यातील रिक्षा चालकासह सोलापुरातील विधी संघर्ष बालकाला अटक केली आहे.. #crime #viral #aajsolapur

February 13, 2026

तुकाराम मुंढेनी केले ९०० दिव्यांग संस्था नोंदणी रद्द.. #viral #public #handicapped

February 13, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0678226

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697