बार्शी – तालुक्यातील उपळे दुमाला येथील वखारिया विद्यालयात सर्व शिक्षा अभियानांतर्गत सर्व समावेशित शिक्षण या उपक्रमांतर्गत कर्णबधिर विद्यार्थिनी भक्ती सगरे हिला तिच्या वाढदिवसा दिवशी एक अनोखी भेट मिळाली.
विशेष गरजा परिपूर्तीसाठी विशेषतज्ञ शिक्षक श्री. मनोज जगदाळे व केंद्रप्रमुख सोनवणे यांच्याकडून विद्यालयाचे मुख्याध्यापक दयानंद रेवडकर, वर्गशिक्षक रेवणसिद्ध दुलंगे यांच्या उपस्थितीत Alimco या कंपनीचे हेरिंग एड किट वाढदिवसानिमित्त प्रदान करण्यात आले. त्यामुळे अध्ययन अध्यापन प्रक्रियेला निश्चितच गती मिळाली आहे.
सदर उपक्रमाचे पालक व विद्यालयाकडून सर्व शिक्षा अभियानाचे आभार मानले.



















