हिंगोली – औंढा नागनाथ तालुक्यातील सारंगवाडी,येथे सुशासन दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्याप्रसंगी श्री माचेवाड उपस्थित होते.याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच ठोंबरे होत्या. प्रमुख पाहुणे श्री.अनिल माचेवाड हे होते.यावेळी विविध प्रकारचे प्रमाणपत्रे वाटप करण्यात आले. तसेच शिधापत्रिका, जिवंत सातबारा चे अर्ज संकलन, अनुदान ekyc, पुरवठा ekyc, निराधार ekyc आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी , डॉ बाबासाहेब आंबेडकर , बिरसा मुंडा,यांचे प्रतिमेला, , पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
यावेळी ,नायब तहसीलदार , अनिता कोलगने मंडळ अधिकारी आनंद बोबडे,, आरोग्य विभागांचे अधिकारी, कर्मचारी पुरवठा, तलाठी स्वामी मॅडम, , सेतू सुविधा केंद्र चालक, सर्व ग्रामपंचायत सदस्य,, ग्रामस्थ उपस्थित होते.


























