पिलीव – माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे दोन हायस्कूल व एक ज्युनिअर कॉलेज आहे. याठिकाणी पिलीव व आसपासच्या परीसरातील लहान अल्पवयीन मुले मोठ्या प्रमाणावर मोटारसायकलचा वापर करतात. शाळा ,कॉलेज सुटल्यावर ही मुले तिन _ तीनजण गाड्यांवर बसुन गाडया अतिशय वेगाने चालवितात याबाबत अनेकदा पालकांना समज दिली पण तरीसुद्धा विद्यार्थी, पालक यांना काही सुद्धा फरक पडत नाही .ही मुले शाळा ,काॅलेज सुटल्यावर अक्षरश रेस खेळतात यामुळे वारंवार अपघात होतात तसेच मुलींना सुद्धा याचा नाहक ञास सहन करावा लागत आहे.
पालकही कसलाही न विचार करता मुलांना गाड्या देत आहेत पण पालक कसलाही पुढील अनर्थ किंवा वाईट घटनांचा विचार करीत नाहीत. नुकत्याच पिलीव येथे झालेल्या अपघातात दोन तरुणांना आपला जिव गमवावा लागला.यातुन तरी पिलीव परिसरातील पालक बोध घेतील का .गाड्याची चढाओढ जिवावर बेतत आहे .तसेच शाळेत नसणारे रोडरोमिओ सुद्धा या विद्यार्थ्यांचा आधार घेत मुलींना ञास देत आहेत. आपण या सर्वांचा ताबडतोब बंदोबस्त करावा अशी मागणी भाजपा युवा मोर्चाचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष राहुल मदने यांनी पिलीव पोलीस प्रशासनाकडे केली आहे .
सदरचे निवेदन हवालदार धनाजी झगडे व पंडीत मिसाळ यांनी स्विकारले असुन यावेळी कडक कारवाई करण्याचे ठोस आश्वासन दिले . तसेच यामध्ये कोणत्याही पुढारी व पालकांनी हस्तक्षेप करु नये असेही संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
सध्या दहावीची परीक्षा सुरु आहे पिलीवसह आसपासच्या गावातून अनेक विद्यार्थी एकाच मोटारसायकलवर तिन _ चारजण ये जा करीत आहेत. अगदी पोलीस स्टेशनसमोरुन सुद्धा हे विद्यार्थी बिनधास्तपणे ये _ जा करीत आहेत.

























