इब्राहिमपूर येथील ग्रामपंचायतच्या वतीने सचिन पगारे,सुनील भेंडरवाल यांची कोतवाल पदी निवड झाल्याने सत्कार
भोकरदन : भोकरदन येथील तहसील कार्यालयात कोतवाल या पदासाठी 17 जागे साठी जालना येथे तारीख 06 जुलै रोजी घेण्यात आलेल्या परीक्षा, त्या परीक्षेचा निकाल 13 शनिवारी जाहीर झाला असून, या परीक्षांमध्ये भोकरदन तालुक्यातील इब्राहिमपूर येथील सचिन श्रीमंता पगारे व सुनील प्रेमसिंग भेंडरवाळ या दोघांची नुकतीच कोतवाल पदी निवड झाल्याबद्दल ग्रामपंचायतच्या वतीने येथील सरपंच रामसिंग डोबाळ, उपसरपंच ऋषिकेश पगारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आलाआहे,
तसेच महिन्यात घेण्यात आलेला एसएससी बोर्डाची परीक्षेत गणपती इंग्लिश स्कूल शाळेतील वर्ग दहावीत सीबीएससी ची विद्यार्थिनी नीता खोलवाल हिने 95% गुण घेऊन घवघवीत गुण घेऊन यश संपादन केले असून तिचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला आहे,
दरम्यान नुकतीच झालेल्या कोतवाल भरती परीक्षा ही शासनाने पारदर्शक व सुरक्षित परीक्षा पेपर घेतल्याने गरीब कुटुंबातील विद्यार्थी हे कोतवाल होऊ शकले आहे,
अशीच कोणतीही भरती पारदर्शक घेतली तर खरे हुशार आणि गरीब कुटुंबातील विद्यार्थि हे शासकीय सेवेत होईल असा विस्वास येथील सरपंच रामसिंग डोभाळ यांनी सत्कार समारंभच्या वेळी व्यक्त केला, या प्रसंगी झालेल्या कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य गोविंदसिंग भेंडरवाळ, पन्नालाल जारवाल, प्रेमसिंग भेंडरवाळ,धनसिंग भेंडरवाळ,दिनेश डोभाळ, केसवसिंग जरवाल,अशोक सोनावणे,काशिनाथ कोल्हे, भीमराव पगारे, संजय पगारे,विकास रगडे,गजानन दांडगे, अजय पगारे, संदीप पगारे,दिपक गोमलाडू, सचिन हिवराळे,किसन जरवाल,रवी पगारे,यांच्या सह ग्रामपंच्यातसदस्य व गांवकरी मोठया सख्येने उपस्तिथ होते, दरम्यान सचिन व सुनील यांची कोतवाल पदी निवड झाल्याने सर्वच स्तरातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे,