सोलापूर : सैनिक स्कूल सातारा माजी विद्यार्थी संघ – सोलापूर शाखेतर्फे आयोजित *२६/११ च्या मुंबईवरील अतिरेकी हल्ल्यातील हुतात्म्यांच्या स्मरणार्थ मागील १७ वर्षांपासून सातत्याने आयोजित केले जाणारे १७ वे वार्षिक रक्तदान शिबिर* अत्यंत यशस्वीपणे पार पडले. या शिबिरात *४५ हून अधिक नागरिकांनी रक्तदान* करून समाजाप्रती आपली बांधिलकी जपली.
या वर्षी *९ वे व ३८ वे एनसीसी बटालियन तसेच संगमेश्वर कॉलेजच्या एनसीसी कॅडेट्सनी*, विशेषतः *महिला कॅडेट्सनी*, मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून शिबिराला उत्साहाची जोड दिली. कार्यक्रमात *९ व्या बटालियनचे कमांडिंग ऑफिसर ले. कर्नल बाबर यांनी भेट देऊन कॅडेट्सचे कौतुक* केले.
अनेक *सैनिक स्कूल सातारा माजी विद्यार्थी संघ – सोलापूर शाखेचे सदस्य आपल्या कुटुंबियांसह* उपस्थित राहून या उपक्रमात सक्रिय सहभागी झाले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी *गंगाधर थळंगे, संजय बुरगुटे, नागेंद्र कोंडेकर, कर्नल सुमित मार्तेंडे, रवी गायकवाड, दिगंबर, पोपट शिंदे, किरण कुलकर्णी, कबाडे, अनिल सगर,राजेंद्र पंडित* तसेच *सोलापूर शाखेतील सर्व माजी विद्यार्थी संघ सदस्यांनी* मोलाचे प्रयत्न केले. तसेच *९ वे व ३८ वे एनसीसी बटालियनच्या अधिकारी व कर्मचारीवर्गाचे* सहकार्यही उल्लेखनीय होते.
विशेष म्हणजे, *रक्तपेढीने (Damani Blood Bank) शिबिराचे आणि सर्व स्वयंसेवकांच्या प्रयत्नांचे कौतुक* करत हा उपक्रम अत्यंत सुव्यवस्थितपणे पार पडल्याचे सांगितले.
सोलापूरकरांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हे रक्तदान शिबिर अत्यंत यशस्वी झाले, असे आयोजकांनी सांगितले.



















