Tuesday, April 14, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

टमटम चालकाच्या मुलाची भारतीय सैन्यात ‘अग्निवीर’ म्हणून निवड

तरुण भारतbyतरुण भारत
November 24, 2025
in west maharashtra
0
0
SHARES
167
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

टेंभुर्णी –माढा तालुक्यातील आकुंभे या छोट्याशा गावातील एक सामान्य टमटम चालकाचा मुलगा थेट भारतीय सैन्यात दाखल होऊन गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. पवन बंडू काकडे यांची भारतीय आर्मीमध्ये ‘अग्निवीर’ म्हणून निवड झाली असून, ही संपूर्ण आकुंभे ग्रामस्थांसाठी अभिमानाची बाब ठरली आहे.

पवनचे वडील बंडू काकडे टमटम चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मुलगा देशसेवेत जावा, ही त्यांची मनोमन इच्छा होती. यासाठी त्यांनी अनेक अडचणींवर मात करत पवनला आर्मी भरतीची तयारी करण्यासाठी अकॅडमीमध्ये प्रशिक्षणास ठेवले. पवनने स्वतःच्या कठोर परिश्रम, शिस्त, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर सैनिकी भरतीसाठी तयारी करत अखेर ‘अग्निवीर’ पदावर आपली चमकदार निवड सुनिश्चित केली.

ही निवड व्यक्तिगत यशापलीकडे जाऊन आकुंभे गावासाठी अभिमानाची, तर टेंभुर्णी परिसरातील युवकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. पवनच्या यशाचा आदर्श घेऊन येथील युवकांनी भारतीय आर्मी, नेव्ही, एअरफोर्स तसेच पोलीस, सीआरपीएफ यांसारख्या सुरक्षा दलांत संधी शोधावी, असा सकारात्मक संदेश या घटनेनिमित्ताने दिला जात आहे.

दरम्यान, अग्निवीर पवन काकडे यांचा टेंभुर्णी शहरातील कुर्डूवाडी चौक येथे पत्रकार बांधवांच्या वतीने सत्कार करून गौरविण्यात आला. यावेळी त्यांना हार, फेटा तसेच भारतीय संविधानाची प्रत प्रदान करण्यात आली.

या सत्कार कार्यक्रमास पत्रकार संतोष वाघमारे, पत्रकार अनिल जगताप, पत्रकार गाडेकर सर, पत्रकार भैया देशमुख, पत्रकार महावीर वजाळे, तसेच आरपीआय नेते परमेश्वर खरात, अनिल जगताप आणि महेंद्र सोनवणे उपस्थित होते.

सत्कार सोहळ्यास मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. यामध्ये राजवर्धन वजाळे, रंजीत करंडे, उमेश पाटोळे, सुमित पाटोळे, रोहन पाटोळे, सोमा गोडसे, किरण पाटोळे, रोहित पाटोळे, अक्षय पाटोळे, आनंद बनसोडे, शंभू पाटोळे, अथर्व गोरवे, अण्णासाहेब खराडे, समाधान चव्हाण, गणेश पाटोळे, विनायक गवळी, किरण शिंदे आदींचा समावेश होता.

पवन काकडे यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी गावातून शुभेच्छांचा वर्षाव होत असून, त्यांच्या या कामगिरीने ग्रामीण भागातील तरुणांसाठी नवी प्रेरणा निर्माण केली आहे.

Post Views: 372
Previous Post

मालेगाव बालिकेच्या अत्याचार प्रकरणी सोलापूरकरांनी व्यक्त केला तीव्र निषेध

Next Post

सैनिक स्कूल सातारा माजी विद्यार्थी संघ रक्तदान शिबिर

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

सैनिक स्कूल सातारा माजी विद्यार्थी संघ रक्तदान शिबिर

ताज्या बातम्या

करमाळ्यात हनुमान चालीसा पठणाचे 151 आठवडे पूर्ण; भक्तीचा अभूतपूर्व जल्लोष

करमाळ्यात हनुमान चालीसा पठणाचे 151 आठवडे पूर्ण; भक्तीचा अभूतपूर्व जल्लोष

April 14, 2026
श्रीकमलादेवी मंदिर येथील श्रीमहादेव मंदिर येथे पितळी पंचमुखी नाग फणी अर्पण

श्रीकमलादेवी मंदिर येथील श्रीमहादेव मंदिर येथे पितळी पंचमुखी नाग फणी अर्पण

April 14, 2026
एमपीसी परीक्षेत शेतकरी कुटुंबातील ऋतुजाने केले घवघवीत यश संपादन

एमपीसी परीक्षेत शेतकरी कुटुंबातील ऋतुजाने केले घवघवीत यश संपादन

April 14, 2026
सारथी स्पोकन इंग्लिश तर्फे १५ एप्रिल पासून उन्हाळी शिबिराचे आयोजन

सारथी स्पोकन इंग्लिश तर्फे १५ एप्रिल पासून उन्हाळी शिबिराचे आयोजन

April 14, 2026
अण्णासाहेब पाटील योजनेच्या धोरणामध्ये केलेले बदल मागे घ्या

अण्णासाहेब पाटील योजनेच्या धोरणामध्ये केलेले बदल मागे घ्या

April 14, 2026
पण रिक्षा चालकांना न्याय मिळवू देऊन ; आडम मास्तरांचा इशारा

पण रिक्षा चालकांना न्याय मिळवू देऊन ; आडम मास्तरांचा इशारा

April 14, 2026
महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याचे अनावरण 

महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याचे अनावरण 

April 14, 2026
सलग १८ तास अध्ययनातून प्रज्ञासूर्यास अभिवादन

सलग १८ तास अध्ययनातून प्रज्ञासूर्यास अभिवादन

April 14, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0809101

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697