अक्कलकोट – संत ज्ञानेश्र्वर संत तुकाराम महाराज समर्थ रामदास स्वामी एकनाथ महाराज सावता माळी आदि संतांनी लोकामध्ये भक्तीभाव निर्माण केला कुळजाती धर्मपेक्षा भक्ती श्रेष्ठ आहे . वारकरी संप्रदायमुळे जातीभेद लिंगभेद नष्ठ झाला . अनेक संतांनी प्रादेशिक भाषामध्पे संत साहित्य निर्माण केले . देवापासुन विभक्त होत नाही तो भक्त . कर्मात देव पहा असे बोधपर विचार जेष्ठ लेखिका कवियत्री आरती प्रसाद काळे यांनी व्यक्त केले
वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान येथे समर्थाच्या १४८ व्या पुण्यतिथी निमित्य आयोजित धर्म संकीर्तन महोत्सवात ७र्वे पुष्प गुंफताना प्रवचन सेवेत आरती काळे बोलत होत्या .
चौकट
प्रत्येकाला मोबाईलचे व्यसन झाले आहे . सध्याच्या पिढीचे मोबाईलवर खुप प्रेम आहे तसे भगवंतावर प्रेम करा . भक्ती करा .
कीर्तन भक्तीचा प्रकार आहे श्रवण भक्ती करा . नित्य भगवंताचे स्मरण करा भगवंताचे चिंतन करा .भक्त फ्हादसारखे भगवंताचे नामस्मरण करा मानसपुजा नाना विथ भक्ती . अर्चन भक्तीभक्तीचे प्रकार आरती काळे यांनी सांगुन भक्तीमध्ये लीनता हवी . अंहकर
नसावा दास्य भक्ती सख्य भक्ती भक्तीचे प्रकार श्रेष्ठत्व स्पष्ठ केले
चौकट पुर्ण
प्रारंभी आरती काळे यांचा परिचय ओंकार पाठक यांनी करुन दिला .. वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान मंदिर समिती वतीने आरती काळे यांचा यथोजित सत्कार करण्यात आला . याप्रसंगी वटवृक्षस्वामी महाराज देवस्थान चेअरमन महेश इंगळे सचिव आत्माराम घाटगे विश्वत महेश गोगी उज्वलाताई सरदेशमुख प्रथमेश इंगळे , प्रा शिवशरण अचलेर , प्रसाद पाटील , श्रीशैल गंवडी , मनोज जाधव ‘ ऋषी लोणारी ,स्वामी लोणारी : काशीनाथ इंडे , बाळासाहेब कुलकर्णी राजु भोसले ‘ महादेव तेली , लक्ष्मण पाटील , प्रसाद सोनार , अशोक कडगंची , ओंकार पाठक , अक्षय सरदेशमुख ‘ गिरिष पवार , संजय पवार ‘ रमेश शिंदे ‘ सुनिल पवार , बाळासाहेब मनोहर देगावकर महादेव तेली बाळासाहेब
एकबोटे ‘ आदि बहुसंख्य स्वामी भक्त उपस्थित होते .


























