सोलापूर – उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत सोलापूर जिल्ह्यातील स्वयंसहायता समूहानी उत्पादित केलेल्या वस्तू,दिवाळी पदार्थ,हस्तकला वस्तू, पणत्या इत्यादी उत्पादनाचे प्रदर्शन व विक्रीसाठी आयोजित केलेल्या रुक्मिणी दिवाळी महोत्सव २०२५ चे उद्घाटन सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील,उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, उमेदचे जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे आदी उपस्थित होते.
बचत गटांनी उत्पादित केलेला सुकामेवा, हस्तकला साहित्य, फराळाचे पदार्थ व चॉकलेट, पणत्या, आकाश कंदील यांची खरेदी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी स्वतः करून सर्व अधिकारी कर्मचारी यांना खरेदी करण्याचे आवाहन केले तसेच सर्वच उपस्थित समूहातील महिला यांच्याशी संवांद साधून शुभेच्छा दिल्या.
सदर रुक्मिणी दिवाळी महोत्सव मध्ये सोलापूर जिल्ह्यातून नावीन्यपूर्ण उत्पादनाचे ३३ स्टॉल लावण्यात आले आहेत.
सदर महोत्सव पार पाडण्यासाठी जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे, लेखाधिकारी शुभांगी देशपांडे, जिल्हा व्यवस्थापक राहुल जाधव, संतोष डोंबे,मीनाक्षी मडीवळी, दयानंद सरवळे, तालुका अभियान व्यवस्थापक, तालुका व्यवस्थापक,प्रभाग समन्वयक परिश्रम घेत आहेत.