सांगोला – सांगोला नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक-२०२५ साठी सोमवार दि.१० नोव्हेंबर पासून नामनिर्देशन पत्रे स्वीकारण्यासाठी सुरुवात झाली असून शनिवार दि.१५ नोव्हेंबर अखेर अध्यक्षपदासाठी ५ नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले असून सदस्यपदासाठी ९ प्रभागातून २५ नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सैपन नदाफ यांनी दिली. अध्यक्षपदासाठी प्राप्त ५ नामनिर्देशनपत्र यामध्ये एकूण ३ पुरुष उमेदवार व २ महिला उमेदवार यांनी अर्ज दाखल केला आहे.
सदस्यपदासाठी प्रभाग क्र.२ अ-(अनू.जाती) १ अर्ज, प्रभाग क्र.३ ब-(सर्वसाधारण) ४ अर्ज, प्रभाग क्र.४ अ- (सर्वसाधारण महिला) २ अर्ज, प्रभाग क्र.५ अ-(ना.मा.प्र.) ५ अर्ज, ५ ब-(सर्वसाधारण महिला) २ अर्ज, प्रभाग क्र.६ अ-(ना.मा.प्र.महिला) २ अर्ज, ६ ब-(सर्वसाधारण) २ अर्ज, प्रभाग क्र.७ अ -(ना.मा.प्र.) १ अर्ज, प्रभाग क्र.८ अ-(अनू.जाती महिला) १ अर्ज, प्रभाग क्र.१० अ-(सर्वसाधारण महिला) १ अर्ज, १० ब-(सर्वसाधारण) २ अर्ज, प्रभाग क्र.११ अ-(ना.मा.प्र.महिला) १ अर्ज, ११ क-(सर्वसाधारण) १ अर्ज असे एकूण २५ अर्ज दाखल करण्यात आले असून यामध्ये एकूण १५ पुरुष उमेदवार व १० महिला उमेदवार यांनी अर्ज दाखल केला आहे अशी माहिती सहा.निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.सुधीर गवळी यांनी दिली.


















