Thursday, June 11, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का, दिग्विजय बागल समर्थकांचे सामूहिक राजीनामे 

तरुण भारतbyतरुण भारत
November 16, 2025
in west maharashtra
0
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जेऊर – राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा झाली आहे.या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गटबाजीमुळे विविध पक्षांमध्ये अनेक घडामोडी पाहायला मिळत आहेत , करमळ्यात शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या असून, निवडणूक आयोगाकडून राज्यात नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आता राजकारणात घडामोडींना वेग आला आहे, राज्यात काही ठिकाणी या निवडणुका महायुती आणि महाविकास आघाडी म्हणून लढवल्या जाणार आहेत, काही ठिकाणी स्थानिक समिकरण लक्षात घेऊन युती आघाडीचा निर्णय घेतला जाणार आहे, तर काही ठिकाणी पक्षांनी स्वबळावर ही निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे.

मात्र आता निवडणूक लागताच पदाधिकारी आणि नेत्यांच्या नाराजीचा फटका देखील पक्षांना बसत असल्याचं दिसून येत आहे, .करमाळयाचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांची शिवसेना शिंदे गटाकडून नगरपालिका निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली . मात्र त्यांची नियुक्ती होताच शिवसेना शिंदे गटात फूट पडल्याचं पहायला मिळत आहे. बागल गटाकडून सामूहिक राजीनामा देण्यात आला आहे. जयवंत जगताप यांची नगरपालिका निवडणूक प्रभारीपदी नियुक्ती होताच शिवसेना नेते दिग्विजय बागल यांच्या समर्थकांनी आक्रमक भूमिका घेत सामूहिक राजीनामा दिला आहे. जगताप यांच्या नियुक्तीमुळे नाराज झालेल्या दिग्विजय बागल यांच्या गटातील तब्बल 55 शाखाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी आपला राजीनामा दिला आहे. 

हा शिवसेना शिंदे गटासाठी ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का मानला जात आहे.एवढंच नाही तर  या पदाधिकाऱ्यांनी नोंदणी केलेले 20 हजार सभासद देखील पक्षातून बाहेर पडणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. हे सर्व वीस हजार सभासद आपले राजीनामे पोस्टाने पक्षश्रेष्ठींना पाठवणार असल्याची माहिती यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.हा निर्णय शिवसेना शाखाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. या सामूहिक राजीनाम्यामुळे करमाळा शहरातील शिवसेना शिंदे गटाची ताकद कमी होण्याची चिन्ह आहेत.

दिग्विजय बागल यांनी यापूर्वी शिवसेना शिंदे गटाकडून करमाळा विधानसभेची निवडणूक लढवली होती, त्यामुळे त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने पक्षात कार्यरत आहेत. माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या नियुक्तीमुळे बागल यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली असून, याच नाराजीतून हे सामूहिक राजीनामा नाट्य घडले आहे.

या बैठकीस श्री मकाई सह साखर कारखाना संचालक सतीश नीळ, आशिष गायकवाड, राजेंद्र मोहोळकर,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक कुलदीप पाटील माजी संचालक आनंदकुमार ढेरे, रंगनाथ शिंदे, माजी सरपंच नवनाथ बदर, अशोक हनपूडे, रावगावचे सरपंच संदीप शेळके, राणा वाघमारे, विजयसिंह हाके, रवी भाऊ शेळके ,अक्षय सरडे, केशव शिवाजी बोराडे, विशाल साधू शिंदे, आनंद रामभाऊ टेकाळे, विजय संजय काळे, प्रशांत भगवान पवार, केशव शिवाजी बोराडे, संदीप पोपट गोडसे, महादेव विठ्ठल माने, सतीश विठ्ठल सोनवणे, दत्तात्रेय रविंद्र काळे, लहू नवनाथ पवार, सचिन नाना शिंदे, पप्पू मारुती सरक, शहाजी गजब काळे, दीपक पांडुरंग हाके, संदीप प्रकाश हाके, सतीश शिवाजी घेडे, हेमंत दत्तात्रेय शिंगरे, सुदाम दादासाहेब झोळ, हेमंत दत्तात्रय गिरंजे, संजय गणपत डोळे, संतोष सोपान चांदणे, ओमकार बाळासाहेब करे, प्रमोद अंबादास हाके, प्रतीक दत्तात्रे हाके, विशाल विष्णू माने, किरण विठ्ठल डोंगरे, संदेश मोहन भोगे, जावेद पठाण, मुबारक इनामदारविविध गावातील ५५ शिवसेना शाखेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व कार्यकारणी सदस्य उपस्थित होते.

Post Views: 57
Previous Post

बार्शीमध्ये मोठी राजकीय हालचाल, वाणी कुटुंबाचा भाजपात प्रवेश

Next Post

सांगोला नगरपरिषद निवडणूक, शनिवारी अध्यक्षपदासाठी ५ तर सदस्यपदासाठी २५ अर्ज दाखल 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

सांगोला नगरपरिषद निवडणूक, शनिवारी अध्यक्षपदासाठी ५ तर सदस्यपदासाठी २५ अर्ज दाखल 

ताज्या बातम्या

जीवनाचे सार्थक करायचे असेल तर शिव आराधनेचा अंगीकार करा  : भालचंद्र महाराज 

जीवनाचे सार्थक करायचे असेल तर शिव आराधनेचा अंगीकार करा  : भालचंद्र महाराज 

June 10, 2026
राज्यात सोलापूरची रेकॉर्डब्रेक कामगिरी ; ५ दिवसांत २० हजार कार्डची नोंदणी !

राज्यात सोलापूरची रेकॉर्डब्रेक कामगिरी ; ५ दिवसांत २० हजार कार्डची नोंदणी !

June 10, 2026

सीईटी-पीसीबी परीक्षेत वालचंद कनिष्ठ महाविद्यालयाचे घवघवीत यश

June 10, 2026

सर्व महाविद्यालयांत विद्यार्थ्यांच्या उपस्थितीसाठी बायोमेट्रिक बंधनकारक!

June 10, 2026
नेत्र आरोग्य व नेत्रदान जनजागृतीसाठी सोजर फार्मसीचे विशेष शिबीर यशस्वी 

नेत्र आरोग्य व नेत्रदान जनजागृतीसाठी सोजर फार्मसीचे विशेष शिबीर यशस्वी 

June 10, 2026

स्मार्ट सिटीत कचरा उचलण्याबाबत दुर्लक्ष 

June 10, 2026

मनपा क्षयरोग अधिकारी डॉ. हराळकर यांच्यावर कारवाईची मागणी

June 10, 2026
एन बी नवले सिंहगडच्या विद्यार्थ्यांची आयटी क्षेत्रात दमदार झेप

एन बी नवले सिंहगडच्या विद्यार्थ्यांची आयटी क्षेत्रात दमदार झेप

June 10, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

byतरुण भारत
June 10, 2026
0

सांगोला -  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि रोजगाराभिमुख शिक्षण देत फॅबटेक टेक्निकल कॅम्पसने सांगोल्याला राज्याच्या शैक्षणिक नकाशावर ठळक स्थान मिळवून...

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

byतरुण भारत
June 9, 2026
0

सोलापूर : भाजप- महायुतीचे विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी सोमवारी महापौर विनायक कोंड्याल यांची महापौर निवासस्थानी सदिच्छा भेट...

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

byतरुण भारत
June 5, 2026
0

सोलापूर : भारतीय जनता पक्षाचे कट्टर समर्थक व प्रभाग क्रमांक ५ मधील प्रभावी कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले राजाभाऊ आलोरे यांनी...

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

byतरुण भारत
May 31, 2026
0

टेंभुर्णी - (ता.माढा) येथे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या पदाधिकारी मेळावा व नवीन पदाधिकारी निवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0902862

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697