सांगोला – महाराष्ट्र राज्य विज्ञान अध्यापक महामंडळ संलग्न असणाऱ्या सोलापूर जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाच्या वतीने सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी दिला जाणारा आदर्श शाळा पुरस्कार सांगोला विद्यामंदिर प्रशालेला जाहीर करण्यात आला असून याचे वितरण दि.१ मार्च रोजी स.१० वा. राजयोग हॉल, करमाळा येथे होणाऱ्या १३ व्या राज्यस्तरीय विज्ञान अधिवेशनामध्ये करण्यात येणार आहे.
सांगोला विद्यामंदिर प्रशालेची विज्ञान विषयातील प्रगती, विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्यासाठी केलेले प्रयत्न आणि शिक्षकांचे मार्गदर्शन या सर्व बाबींचा विचार करून आदर्श शाळा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
या यशाबद्दल संस्थाध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके, उपाध्यक्ष ॲड.विजयसिंह चव्हाण, सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, खजिनदार शंकरराव सावंत, सदस्य शीलाकाकी झपके, विश्वेश झपके, प्राचार्य अमोल गायकवाड, उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे, उपमुख्याध्याक चिंतामणी देशपांडे, पर्यवेक्षक प्रदीप धुकटे, उत्तम सरगर, काकासो नरुटे यांनी प्रशालेतील सर्व विज्ञान विषय शिक्षक व विद्यार्थी यांचे अभिनंदन केले.

























