सोलापूर : सोलापूर शहरातील नागेश करजगी ऑर्किड स्कुल मध्ये प्रभू येशूख्रिस्त यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने ख्रिसमस साजरा करण्यात आला.
ख्रिसमसच्या निमित्ताने शाळेमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे उदघाट्न संस्थेचे अध्यक्ष डॉ.कुमार दादा करजगी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी संस्थेच्या सचिवा वर्षा विभुते,स्कुल व्यवस्थापक अक्षय चिडगुंपी,प्राचार्या रुपाली हजारे,स्कुलच्या मार्गदर्शिका मीना पारखे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांनी प्रभू येशूख्रिस्त यांच्या जन्मावर आधारित सुंदर अशा गाण्यावर नृत्य सादर केले.जिंगल बेल जिंगल बेलच्या तालात ऑर्किडचे विद्यार्थी रमले असताना त्यांच्या भेटीसाठी सांताक्लॉज अवतरला. सांताक्लॉजच्या येण्याने सर्व बालचमुंच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर निर्माण झाली.यावेळी सांताक्लॉजने या विद्यार्थ्यांना अनेक भेटवस्तू देऊन त्यांच्या आनंद द्विगुणित केला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शाळेतील शिक्षिका हर्षा गुडपल्ली यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

















