*सरसेनानी मा.अशोकजी सिंघल भगवे वस्त्र न घातलेले संत होते -अनिल भालेराव*
*छत्रपती संभाजीनगर येथे सरसेनानी अशोक सिंघल विशेषांक प्रकाशन सोहळा संपन्न*
नेतृत्वाचे चार प्रकार समजले जातात राजकीय नेतृत्व, सामाजिक नेतृत्व,धार्मिक नेतृत्व,आणि सांस्कृतिक नेतृत्व.मा.अशोकजी यांनी आपल्या वैयक्तिक गुणांच्या आधारावर आणि संघनिष्ठेच्या बळावर आपले सांस्कृतिक नेतृत्व हे जगामध्ये फिरून स्थिर केले होते. हिंदू,हिंदुत्व,हिंदुराष्ट्र आणि राम जन्मभूमी ही अशोकजींची अविचलनिष्ठा होती विरोधकांवर ते कठोर प्रहार करत पण विरोधकांविषयी त्यांच्या मनात क्रोध आणि विद्वेषाचा विकार आढळला नाही. आपल्या विचारांशी असहमत असणाऱ्या लोकांना जेव्हा अशोकजी भेटत तेव्हा त्यांच्या मनावरही आपल्या आत्मीय मधुर व्यवहाराची छाप टाकत असत. त्यामुळे विरोधकही त्यांच्याकडे आदराने पाहत असत.
अशोकजी भगवे धारण न केलेले संत होते त्यांच्या व्यवहारात पारदर्शीपणा होता पण व्यवहार कुशलताही होती. त्यांच्या वागण्या बोलण्यातील नितळपणा पाहूनच लोकांना ते आपलेसे वाटत आणि अशोकजी लोकांना आपलेसे करून घेत असे उद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत संघचालक मा. अनिल भालेराव यांनी काढले ते त्रिदेवता मंदिर ट्रस्टच्या सभागृहात दिनांक २८ जुलै ला सरसेनानी अशोकजी सिंघल विशेषांक प्रकाशन प्रसंगी बोलत होते यावेळी व्यासपीठावर वेदमूर्ती अनंत पांडव गुरुजी श्री.राजीव जहागिरदार श्री.विनोद शेवतेकर श्री.गौतमजी बारस्कर श्री.योगेश पाठक उपस्थित होते.
या प्रकाशन समारंभ प्रसंगी बोलताना राजीव जहागिरदार यांनी आपले विचार व्यक्त केले ते म्हणाले तब्बल वीस वर्ष विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष राहिलेले अशोकजी सिंघल यांच्या उल्लेखाशिवाय राम मंदिर आंदोलनाचा इतिहास अपूर्ण असेल त्यांचे स्मरण केल्याशिवाय मंदिर आंदोलनाचा इतिहास पुढे सरकू शकत नाही आज अशोकजी हयात नाहीत पण मंदिर आंदोलनाचा जो पाया त्यांनी रचला होता संपूर्ण देशातील जनमानस ढवळून काढले होते त्याचाच परिणाम म्हणून सर्वोच्च न्यायालयाने त्याच जागी मंदिर होईल असा निर्णय दिला आणि त्या स्थानावर भव्य राम मंदिर दिमाखाने उभे आहे
अशोकजी सिंघल हे दूरदृष्टी असलेले नेते होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ प्रचारक होते आणि संघाच्या माध्यमातून पुढे ते विश्व हिंदू परिषदेत सक्रिय झाले त्यांनी नेतृत्व स्वीकारल्यानंतर मंदिर आंदोलनाला एक गती मिळाली आणि अतिशय झपाट्याने हे आंदोलन तीव्र होत गेले आज त्याची परिणीती म्हणजे अयोध्येतील भव्य राम मंदिर आहे .
पुस्तक प्रकाशन समारंभ कार्यक्रमाची सांगता सांघिक पसायदानाने झाली पुस्तक प्रकाशन समारंभाला शहरातील 200 नागरिक माता भगिनी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. महेश कानगावकर ,रवी कुलकर्णी योगेश पाठक अरुण जाधव महेश बसेर योगेश भोसले यांनी मेहनत घेतली.