अक्कलकोट – गुरववाडीच्या सरपंच लक्ष्मी पुजारी यांना राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार जाहीर झाला असून गुरुवार ३० ऑक्टोबर रोजी अहिल्यानगर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि ग्रामविकासमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.
महाराष्ट्र प्रदेश सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य पुरस्कृत राज्यस्तरीय आदर्श सरपंच सन्मान पुरस्कार अक्कलकोट तालुक्यातील गुरववाडीच्या सरपंच लक्ष्मी म्हाळप्पा पुजारी यांना जाहीर झाला आहे. सरपंच लक्ष्मी म्हाळप्पा पुजारी यांनी त्यांचे पती म्हाळप्पा पुजारी यांच्या साथीने गेल्या पाच वर्षात गावात एक कोटीपेक्षा अधिक रुपयांची विकास कामे करून आणली आहेत. गावात अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
या पुरस्कार वितरण सोहळ्यास शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाघचौरे, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील, सरपंच सेवा संघाचे अध्यक्ष रोहित पवार, सचिव बाबासाहेब पावसे, संपर्कप्रमुख-अमोल शेवाळे आदींच्या उपस्थितीत होणार आहे.
गुरुवार ३० ऑक्टोबर रोजी अहिल्यानगर येथील माऊली संकुल सभागृह सावेडी रस्ता येथे हा सोहळा होत आहे. राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार मिळाल्याबद्दल सरपंच लक्ष्मी माळाप्पा पुजारी यांचे अक्कलकोट तालुका व जिल्हाभरातून कौतुक होत आहे.




















