सातारा, 29 जून (हिं.स.) : येथील श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या 21व्या भजन मेळाव्यामध्ये मान्यवरांची उपस्थिती हा या कार्यक्रमाचा विशेष भाग असून या कार्यक्रमात या प्रमुख उपस्थित मान्यवर, सन्माननीय व्यक्तींचा शाल ,श्रीफळ तसेच नटराज्याची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच या सोहळ्यास उपस्थित असलेल्या 300 हून अधिक सुवासिनी महिलांना साड्यांचे वितरण करण्यात आले .या कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक श्री गोपी भागवत यांनी या महोत्सवा अंतर्गत सुरू असलेल्या कार्यक्रमाची उपस्थित मान्यवरांना माहिती देताना सांगितले की, श्रीमद शंकराचार्य चंद्रशेखरेंद्र सरस्वती यांच्या आशीर्वादाने तसेच आयोध्या श्रीराम मंदिराचे उभारणीमध्ये विशेष सहभाग आणि मार्गदर्शन करणारे परमपूज्य जयेंद्र् सरस्वती स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने व सध्याचे कांचीपिठाचे प्रमुख शंकराचार्य श्रीमद स्वामी विजयेंद्र सरस्वती महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा भजन मेळावा सातारा येथील भव्य अशा नटराज मंदिरात आयोजित करण्यात आला होता. याला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून सहकार्य केले तसेच सहभाग घेतला याबद्दल भजन समिती या सर्वांचे विशेष आभार मानत आहे .
याबद्दल मेळाव्यामध्ये उपस्थित असलेल्या सन्माननीय महोदयांचा समितीच्या वतीने शान श्रीफळ व श्री नटराज प्रतिमा देऊन तसेच महिला सुहासिनींना साडीचे वितरण करताना मला विशेष आनंद होत आहे या शाल व साडी वितरण कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून हेमंतराव हरहरे ,मुकुंदराव आफळे, सुभाष दर्भे , एडवोकेट नितीन शिंगटे ,महेश शिवदे,जयंत देशपांडे,आशिष शहाणे यांचेसह इस्कॉनचे प्रवीणप्रभू रसाळ, विजयराव गाढवे, अमेरिकेहून आलेले शंकर नारायणन, विश्व हिंदू परिषदेचे मान्यवर उपस्थित होते. वेदमूर्ती जगदीश शास्त्री भट मंदिराचे व्यवस्थापक चंद्रशेखरन नारायणराव आदींच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला .
चेन्नई येथील भगवंत नाम प्रचार मंडळीच्या वतीने २१ वा वार्षिक भजन महोत्सव साताऱ्यात होत आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष व स्टेट बँक ऑफ इंडियाचे माजी सहाय्यक महाव्यवस्थापक गोपी भागवत, श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिर ट्रस्टचे व्यवस्थापकीय विश्वस्त रमेश शानभाग, वेदमूर्ती जगदीशशास्त्री भट, नारायण राव आदी उपस्थित होते. श्री कांची कामकोटी मुलम्यान सर्वज्ञ पीठम, कांचीपुरुमचे प पू शंकराचार्य, श्री श्री श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती स्वामीजी, प पू श्री श्री श्री जयेंद्र सरस्वती स्वामीजी व विद्यमान पीठाधीश्वर प पू श्री श्री श्री शंकरविजयेंद्र सरस्वती स्वामीजी यांच्या कृपाशीर्वादाने हा मेळावा होत आहे. या मेळाव्यासाठी मंदिरात व मंदिराबाहेर पावसापासून संरक्षण होणारा भव्य सभामंडप उभारण्यात आला आहे. मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मंदिरामधील सभामंडपामध्ये दररोज भजनसेवा होईल. मंदिराबाहेरील हॉलमध्ये अन्नदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. दररोज सकाळी अल्पोपहार, दुपारी व रात्री मोफत अन्नदान होईल.
दरम्यान, या मेळाव्यात सकाळी सात ते दुपारी एक तसेच संध्याकाळी तीन ते रात्री साडेआठ या वेळेत जेष्ठ भागवतकरांकडून भजनसेवा होईल. ३० जून रोजी श्री राधा कृष्ण कल्याणम (लग्न सोहळा) व प पू शंकराचार्य, श्री श्री श्री महास्वामी चंद्रशेखरेंद्र सरस्वती स्वामीजींच्या पादुकांना पुष्प लक्षार्चना नियोजित आहे. सर्व भाविक भक्तांनी या भजन मेळाव्यास उपस्थित राहून श्री शिवकामसुंदरी व आनंद नटराज आणि प पू शंकराचार्यांचे आशीर्वाद घ्यावेत, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
30 जून रोजी या भजन मेळाव्यामध्ये वरील कार्यक्रम संपन्न होऊन या कार्यक्रमाची सांगता होणार आहे.