बार्शी – श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित शंकरराव निंबाळकर अध्यापक विद्यालय बार्शी येथे मंगळवार दि. १० मार्च रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथी तसेच जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या सुविद्या पत्नी त्यागमूर्ती लक्ष्मीबाई जगदाळे यांची जयंतीदेखील साजरी करण्यात आली.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेज, बार्शी येथील सौ. ज्योती डोळस व राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा विजेत्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नालगांव येथील सौ. दिपाली सबसगी या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ दीपक गुंड सर हे होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व त्यागमूर्ती लक्ष्मीबाई जगदाळे यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तसेच प्रमुख पाहुण्यांचा परिचय कु. मोहिनी मडके यांनी करुन दिला. अध्यापक विद्यालयातील कु. साक्षी बडबडे, कु. मस्के निकिता, कु. भाले प्रगती, कु. गुंड स्नेहा, कु. मोरे संजीवनी, कु. आम्रपाली जावळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या सर्वांचा सन्मान प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी माजी विद्यार्थिनी कु. संध्या घोलप यांची महिलांवरती आधारित ‘ती ‘ कविता याप्रसंगी सादर केली.
यानंतर राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा विजेत्या सौ. दिपाली सबसगी यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी याप्रसंगी स्त्रीचे महत्व प्रत्येक क्षेत्रात आहे. त्यांनी मुलींना मार्गदर्शन करताना आधुनिक काळात तंत्रज्ञानाची माहिती घेणे व ते कौशल्य आत्मसात करणे आवश्यक आहे. त्यांनी आधुनिक काळात कृत्रिम बुद्धिमत्ता यामुळे शिक्षण व शिक्षक हे बदलत आहे. आता खडू व फळा याबरोबरच स्मार्ट बोर्ड, पॅनल बोर्ड, AI याबाबतीत सर्वांनी अपडेट राहणे गरजेचे आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना आपले अध्यापनातील काही अनुभव तसेच नवोपक्रम कसा तयार करावा व राबवावा, तसेच भावी शिक्षकांनी विविध स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना तयार करावे हे देखील विद्यार्थ्यांना सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सौ. ज्योती डोळस – मोरे यांनी याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने स्त्री पुरुष समानता या विषयावर त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विविध समाजसुधारक यांची उदाहरणे दिली. ज्यांनी स्त्री पुरुष समानतेसाठी आपले आयुष्य वेचले. त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे जीवन कार्य विद्यार्थ्यांसमोर मांडले. त्यासोबतच विद्या बाळ, धोंडो केशव कर्वे, गो.ग.आगरकर, राजर्षी शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर या सर्व समाजसुधारकांनी स्त्री पुरुष समानता, स्त्री उद्धार यासाठी उल्लेखनीय कार्य केले. त्यांनी सध्याच्या युगात आपण दैनंदिन जीवनात देखील स्त्री पुरुष समानतेसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यांनी विविध उदाहरणे देऊन स्त्री पुरुष समानता स्पष्ट केली.
शेवटी अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ दीपक गुंड यांनी असे कार्यक्रम आयोजन हे विद्यार्थ्यांना प्रेरणा व प्रोत्साहन देण्यासाठी तसेच स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी बदल आवश्यक आहे.
कार्यक्रमाचे आभार कु. शिफा पठाण यांनी तर सूत्रसंचालन कु. कलाश्री पवार व कु. मिस्किन यांनी केले.

























