तभा फ्लॅश न्यूज/ हदगाव : हदगाव तालुक्यातील शाळकरी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेत, कॉलेज व इतर शैक्षणिक संस्थेत जाण्याकरिता स्वतंत्र बसची मागणी पूर्ण करण्याकरिता आज सकाळी तामसा रोडवर श्री दत्त कॉलेज जवळ आंदोलनाचा पवित्रा घेतला तर यामुळे महामंडळ प्रशासनास खडबडून जागे होत आगार व्यवस्थापक यांनी आपल्या प्रतिनिधीस पाठवून विद्यार्थिनीचे मागणी लक्षात घेता लवकरच आपल्यासाठी स्वतंत्र बसची व्यवस्था करण्यात येईल असे लेखी पत्र देऊन त्या विद्यार्थिनींचे आंदोलन स्थगित करण्यात आले. यामुळे तामसा रोडवर काही काळ वाहतूकीचा बोजवारा उडाला होता.
एकीकडे महाराष्ट्र शासन हे मुलींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून मुलींचे शिक्षण थांबू नये यासाठी प्रयत्नशील असते पण त्यास अपवाद हदगाव महामंडळाच्या गळथान कारभार ठरला असून याची प्रचिती आज हदगाव तालुक्यातील हरडफ येथील मुलींना येत आहे.
कॉलेज व शाळेत व इतर शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेण्यासाठी स्वतंत्र बस नसल्याकारणाने आज या मुलींनी आक्रमक पवित्र घेत श्री दत्त कॉलेज जवळ बस अडवून आंदोलन सुरू केले होते यामुळे आगार व्यवस्थापकाचे धाबे चांगलेच दणाणले होते त्यांनी त्वरित आपल्या प्रतिनिधीस पाठवून आपले मागण्या पूर्ण होईल असे आशयाचे पत्र देऊन या मुलींचे आंदोलन थांबवले.