पंढरपूर – एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी–पंढरपूर येथील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी विभागातील कु. मयुरी पाटील हिची इंडियन ओव्हरसीज बँकेत सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager) या प्रतिष्ठित पदावर निवड झाली आहे. मेहनत, चिकाटी आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर यश मिळवता येते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे असे वक्तव्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी केले.
कु. मयुरीच्या या उल्लेखनीय यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची व विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल कारकिर्दीची परंपरा अधोरेखित झाली आहे. तिच्या या निवडीबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी तसेच इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी विभागाचे विभागप्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी यांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
कु. मयुरीचे यश हे तिच्या अथक परिश्रमाचे, शिस्तबद्ध अभ्यासाचे आणि सकारात्मक दृष्टिकोनाचे फलित असल्याचे मान्यवरांनी नमूद केले. तिच्या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी–पंढरपूर मधील सर्व शिक्षक, शिक्षकेतर यांच्या वतीने कु. मयुरी पाटील हिच्या पुढील वाटचालीस उज्ज्वल भवितव्य व यशस्वी कारकिर्दीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.


















