बार्शी – स्वर्गीय गायक मोहम्मद रफी यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त बुधवारी बार्शीतील हौशी कलाकार गृप यांनी मोहम्मद रफी यांना रफीच्या गीतांचा आदरांजली पर कार्यक्रम घेतला.
सदर कार्यक्रम फक्त हौशी कलाकार ग्रुप सदस्य गोविंद तापडिया यांच्या तापडिया टी सेंटर, घोडे गल्ली येथील हॉलवर पार पडला.
या कार्यक्रमात मेजर अविनाश हिंगमीरे, अशोक डहाळे, गोविंद तापडिया, राहुल झोंबाडे, अजय खंडेलवाल आणि सुनिल फल्ले या सदस्यांनी तसेच सौ. सुजाता हिंगमीरे, सौ. लक्ष्मी तोरड, सौ. रुपाली पवार, सौ स्वाती डोळे, सौ. निमा कांबळे या महिला सदस्यांनी एकापेक्षा एक सरस, दर्जेदार रफी यांची लोकप्रिय, गाजलेली गीते सादर केली. बार्शीतील एक नवीन गायिका स्मिता बोरा गेस्ट कलाकार म्हणून यांनीही दोन सुंदर गीते गायली. ग्रुपमधील सर्व सदस्यांनी २-२ गीते गायली.
सदर कार्यक्रमात मस्त बहारो का आशिक, ओ मेरी मेहबुबा, मेरे देश प्रेमियो, मुझे कितना प्यार तुमसे, मुझे दुनिया वाले शराबी ना समझो, डफली वाले, छुप गये सारे नजारें, बदन पे सितारे, मांग के साथ तुम्हारा, वादा करले साजना, जनम जनम का साथ हो, मै जिंदगी का साथ निभाता, ये दिल तुम बिन लगता नहीं इत्यादी गीते गायली.
गोंविंद तापडिया यांनी कार्यक्रमासाठी हॉल उपलब्ध करुन दिल्याबद्दल अशोक डहाळे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे नियोजन सुनिल फल्ले आणि गोविंद तापडिया यांनी केले होते.


























