सांगोला – जेष्ठ नागरिकांनी त्यांच्या हक्काबद्दल जागरूक राहावे असे आवाहन दिवाणी न्यायाधीश एस.एस.साळुंखे यांनी करत हातात फक्त सुतळी बॉम्ब आसून चालत नाही तर दुसऱ्या हातात पेटती उदबत्ती असावी लागते, तरच बॉम्बचा आणि तुमचा वचक राहतो असा कानमंत्रही त्यांनी दिला. ते सांगोला तालुका विधी सेवा समिती व विधीज्ञ संघ सांगोला, यांचे संयुक्त विद्यमाने तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत वाढेगाव, ता.सांगोला येथे आयोजित ज्येष्ठ नागरिक व माजी सैनिकासाठी हक्क व कायदे याविषयी मार्गदर्शन शिबिरात बोलत होते.
समाजातील तळागाळातील तसेच सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळावा हे उद्दीष्ट ठेवून सर्वोच्च न्यायालय दिल्ली, उच्च न्यायालय मुंबई, राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांचे आदेशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूरचे अध्यक्ष एम.एस.शर्मा यांचे मार्गदर्शनाखाली तसेच सचिव पी.पी.पेठकर यांचे सहकार्याने सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी विधीज्ञ संघाचे अध्यक्ष ऍड.एम.एन.ढाळे, सेना मेडल कॅ.रावसाहेब साळुंखे, सरपंच कोमल डोईफोडे उपस्थित होत्या.

याप्रसंगी ग्राम महसूल अधिकारी गौरव कुंभार व ऍड.आयुब पटेल यांनी माजी सैनिक व ज्येष्ठ नागरिकांसाठी असणाऱ्या विविध योजनांची, ऍड.आर.आर.केदार यांनी पालक आणि जेष्ठ नागरिकांची देखभाल आणि कल्याण कायदा २००७ याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैजिनाथ घोंगडे, सूत्रसंचालन योगेश तारे यांनी केले.
आभार ऍड.विजयसिंह चव्हाण यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रदीपकुमार इंगोले, सोमनाथ होळ, शिवाजी दिघे, दत्तात्रय शिनगारे, सुरेश डोईफोडे, दादासाहेब दिघे, अर्जुन शिंदे, महेश आठवले, ग्रा.पं.कर्मचारी शिवाजी दिघे, उद्धव माने, राहुल इथापे, शिवाजी सूर्यगंध, विकास ऐवळे, संदेश भडकुंबे यांनी परिश्रम घेतले.


















