अकलूज – शंभू महादेवाची यात्रा आज गुढीपाडव्यापासून सुरू झाली गुढीपाडव्याला महादेवाच्या कावडी तयार होतात गावप्रदर्शना करतात अकलूज येथे गंगाधर नामदेव कुंभार यांचे मानाची कावड तयार झाली त्यांच्या चार-पाच पिढ्यापासून ही परंपरा त्यांच्याकडे चालत आली आहे.
राजू कुंभार यांनी याबाबत सांगितले की आमच्या आजोबा पणजोबापासून ही परंपरा चालू असून गुढीपाडव्याला या कावडी तयार केला जातात व पौर्णिमा हनुमान जयंती दिवशी भंडारा करून यांचे विसर्जन केले जाते दरम्यान एकादशीच्या दुसऱ्या दिवशी महा देवास शिखर शिंगणापूर येथे या कावडी पाण्याची धार घालण्यासाठी जातात.
महाराष्ट्राबरोबरचआंध्र मराठवाडा येथून मानाच्या कावडी घेऊन भावा भाविक मोठ्या प्रमाणावर शिंगणापूर कडे येतात शिंगणापूरच्या पायथ्याशी असलेला मुंगी घाट या कावडी घेऊन चढण्याची प्रथा आहे यावेळी हर हर महादेव महादेव असा जयघोष करत भाविक हा अवघड घाट चढतात.























