जेऊर – शेटफळ तालुका करमाळा येथील रणजीत सुधीर पोळ यांची पुणे शहर पोलीस पदी निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला रणजीत पोळ याचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा शेटफळ येथे झाले असून माध्यमिक शिक्षण भारत हायस्कूल जेऊर व उच्च माध्यमिक शिक्षण यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा येथे झाले आहे.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून संघर्ष वाटका वाटचाल करत जिद्द चिकाटी आणि प्रयत्नाच्या जोरावर त्याची पुणे शहर पोलीसपदी निवड झाली आहे. त्याच्या या यशाबद्दल ग्रामस्थांच्यावतीने शेटफळ येथील शिवस्मारकासमोर स्वागत करून त्याचा व वडील सुधीर पोळ यांचा जाहीर सन्मान करण्यात आला.
यावेळी बापूराव नाईकनवरे महाराज गजेंद्र पोळ सत्यवान लबडे, रोहित घोगरे यांनी मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाला माजी सरपंच मुरलीधर पोळ ,विकास गुंड साहेबराव पोळ , दशरथ लबडे, राजाभाऊ रोंगे,अशोक घोगरे संतोष पोळ शिवाजी पोळ ,शंकर पोळ सुहास पोळ, प्रताप पोळ,बाबुराव चोरगे, राजेंद्र पोळ, विशाल पोळ,सचिन पोळ, महेश पोळ, किरण बळीराम पोळ, नानासाहेब पोळ, बापूराव पोळ,चेतन पोळ सुंदरदास पोळ यांच्यासह गावातील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
























