मंगळवेढा – नगरपालिकेची निवडणुकीच्या संदर्भात शिवसेना व मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक मा. दिलीप बापू धोत्रे यांच्या आदेशाने मनसे जिल्हाप्रमुख प्रशांतराव गिड्डे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली .
यावेळी मनसेचे प्रमुख पदाधिकारी व शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मनसेचे प्रमुख पदाधिकारी व शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बैठकीमध्ये नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी पक्षाच्या चिन्हावर उमेदवार उभे करण्याचे सांगण्यात आले.
त्यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी मनसेतर्फे सौ. सुरेखा नारायण गोवे ,शिवसेना (उबाठा )तर्फे क्रांतीताई दत्तू , नगरसेवक पदासाठी प्रभाग क्रमांक 7 मधून अविनाश चंद्रकांत पवार , प्रभाग क्रमांक 8 मधून सौ.शरयू दत्तात्रय हजारे ,प्रभाग क्रमांक 6 मधून निलेश नारायण गोवे , शिवसेनेतर्फे प्रभाग क्रमांक 9 मधून अरविंद कोळी यांना उमेदवारी देण्याचे ठरले आहे .
इतर समविचारी आघाडीशी समझोता झाल्यावर वरील उमेदवारांचा विचार विनिमय केला जाईल.समविचारी आघाडी, मनसे व शिवसेना ( उबाठा) या तिन्ही पक्षाच्या समजोत्यावर मंगळवेढा नगरपालिकेची निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढविण्यात येईल असे जिल्हाध्यक्ष यांनी यावेळी सांगितले.
यावेळी उपस्थित मनसे जिल्हा समन्वयक नारायण गोवे,जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत पवार, तालुकाध्यक्ष धनाजी गडदे शहराध्यक्ष राजवीर हजारे,महिला जिल्हाध्यक्ष भारती चौगुले,तालुका उपाध्यक्ष रवी कांबळे,तालुका उपाध्यक्ष बालाजी भोजने,मनसे विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष रवी कोरे, वाहतूक सेना शहराध्यक्ष कृष्णा ओमने,शिवसेनेतर्फे तालुका प्रमुख तुकाराम भोजने, शहर प्रमुख बापू खराडे, उप शहर प्रमुख विशाल इंगळे, रमेश ढगे, सुनील ओमने, दीपक देवकर, रवी नाईकवाडे,अरबाज इनामदार कु. निर्मला भगरे,प्रवीण जावळे,रमेश मुढे आदी मनसे व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.




















