सोलापूर : शिवसेना उबाठा पक्षाच्या पदाधिकारी बैठकीत संघटक पुरूषोत्तम बरडे व जिल्हाप्रमुख अजय दासरी यांच्या समर्थकात वाद चव्हाट्यावर आल्याने माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी दोन्ही गटाच्या पदाधिकार्यांना सुनावले. उद्धवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे, सोलापूर संपर्कप्रमुख अनिल कोकीळ यांच्या प्रमुख उपस्थितीत शहर उत्तर व मध्य विधानसभा मतदारसंघाची बैठक झाली.
सुरुवातीला उपनेत्या अस्मिता गायकवाड आणि महिला आघाडी प्रमुख अमिता जगदाळे यांच्यात वाद झाला. त्यानंतर दासरी व बरडे समर्थकां मध्येही जोरदार वादाला सुरुवात झाली. बरडे समर्थकांनी ‘दासरी हटाव’चा नारा दिला.
लहू गायकवाड, सुरेश जगताप आणि दत्ता कलाटी यांनी दासरींवर टीका केली. तर, शशीकांत बिराजदार आणि रवींद्र नागेणकेरी यांनी पक्षातील गद्दारांवर कारवाईची मागणी केली. त्यामुळे बरडे समर्थक संतापले. दुसरीकडे अस्मिता गायकवाड यांचा नावाचा उल्लेख एकेरी केल्याने त्यांच्या समर्थकांनी दासरी यांना धारेवर धरले.
…
शिवसेना उबाठाच्या बैठकीतील वादाबाबत जिल्हा प्रमुख अजय दासरी यांच्याशी संपर्क साधला असता बैठकीत पदाधिकार्यांचे किरकोळ वाद झाले असून आमच्यातील मतभेद मिटल्याचे सांगत महापालिकेवर भगवा फडकविण्यासाठी शिवसैनिक सज्ज असल्याचे सांगितले.
…
माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या पदाधिकारी व कार्यकर्ता बैठक होती. सोमवारी कोर्टाच्या कामानिमित्त बैठकीला उपस्थित नव्हतो. त्यामुळे बैठकीत झालेल्या वादाची कल्पना नाही. कार्यकर्ते शिवसैनिक असल्याने वाद झाला असेल.
पुरूषोत्तम बरडे, लोकसभा क्षेत्रप्रमुख , उबाठा शिवसेना




















