Monday, April 20, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

हिंदुत्व आणि धर्मरक्षणासाठी सर्व संपत्ती, सुखाचा त्याग करून शर्मिला पागे आजींचा संन्यास

तरुण भारतbyतरुण भारत
October 29, 2025
in solapur
0
0
SHARES
21
VIEWS
Share on FacebookShare on Twitter


पंढरपूर – हिंदुत्व आणि देशप्रेम वाढीस लागावे या एकमेव उद्देशाने प्रेरित होऊन सर्व संपत्ती, पैसा याचा त्याग करून वानप्रस्थाश्रम स्वीकारणाऱ्या मुळच्या कोल्हापूर येथील शर्मिला श्रीपाद पागे आजीं आषाढी यात्रे पासून पंढरपूर येथे  वास्तव्य करीत आहेत. कार्तिकी यात्रा आणि चार्तुमासाच्या समाप्ती नंतर पुढच्या प्रवासासाठी पागेआजी मार्गस्थ होणार आहेत.  एकंदरीतच सर्व भौतिक सुखांचा त्याग करून  केवळ  हिंदूत्व आणि धर्मरक्षणासाठी जीवन जगणाऱ्या शर्मिला पागेआजींचे  उदाहरण हे आजच्या स्वार्थी आणि संकुचित वृत्तीच्या जगात  वावरणाऱ्या आपमतलबी तसेच भ्रष्टाचारी लोकांच्या डोळ्यात खरोखरच अंजन घालणारे असेच आहे. 

शर्मिला पागेआजी आषाढी वारी पासून पंढरपूर येथे वास्तव्यास आहेत, हिंदुत्व आणि देशप्रेम वाढावे यासाठी २००७  साली त्यांनी व त्यांचे पती श्रीपाद पागे यांनी आपले घरदार सोडले.  विशेष म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये त्यांना उत्तम पगाराची नोकरी होती. पुणे येथे दोन मुले, सुना, नातवंडे असा सुख समृध्दीने भरलेला परिवार असूनही भौतिक सुखांचा त्याग करत त्या देशभर पायी भ्रमंती करीत असतात.

पंढरपूर येथे पाच, सात घरात मधोकरी मागून पूर्ण वेळ त्या नामस्मरणात घालवितात. सर्वात कठीण अशी नर्मदा परिक्रमा त्यांनी दोन वेळा केली आहे. एक काठी, अंथरूण, व कपड्याची पिशवी एवढीच त्यांची संपत्ती आज त्यांच्या सोबत आहे. पंढरीत संपूर्ण चातुर्मास करून त्या पुन्हा नर्मदा किनारी जाणार आहेत. शर्मिला पागेआजी या गोंदवलेकर महाराजांच्या अनुयायी असून श्री दत्त संप्रदाय व हिंदुत्वाच्या विचाराचा प्रसार करतात.

२०२० साली कोरोना या जीवघेण्या रोगाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही आपले व्रत पागे आजींनी चालूच ठेवले. देशभरातील अनेक धार्मिक व अध्यात्मिक ठिकाणी भेट दिली. पती श्रीपाद पागे यांचे आकस्मिक निधन झाले तरीही त्या मागे हटल्या आपल्या ध्येया पासून थोड्याही विचलित झाल्या नाहीत. पतीला खांदा देऊन त्यांनी पतीच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला होता. तरीपण त्या स्वतःला साधारण स्त्री आहोत असेच आजी मानतात.
——————

मोदीं आणि योगींना भेटण्याची तीव्र इच्छा
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भेटण्याची त्यांची इच्छा आहे. नरेंद्र मोदी यांच्या मुळे देशात चांगले दिवस आले असून हिंदुत्व टिकून आहे असे त्या मानतात.
——————

आत्तापर्यंत अनेक तिर्थक्षेत्रांना भेटी
सर्वप्रथम कोल्हापूर, पैजारवाडी, वैभववाडी, गगनबावडा,गोवा, कारवार, कर्नाटक, शृंगेरी मठ, केरळ, तामिळनाडू येथील तीर्थक्षेत्रां बरोबरच अयोध्या, वृंदावन, मथुरा, नैमिष्यराण्य काशी या क्षेत्रांना देखील आत्तापर्यंत त्यांनी भेटी दिल्या आहेत. या भेटी दरम्यान त्यांनी आश्रम, धर्मशाळा किंवा कुणाच्यातरी घरात मुक्काम केला.  नर्मदा परिक्रमा करीत असताना कोठेही चिरंजीव असणारा अश्वत्थामा किंवा हनुमान भेटत नाही या सर्व अफवा असतात असेही पागेआजी सांगतात. 
—————–

नर्मदा किनारी पतीने सोडले प्राण
२०२० मध्ये नर्मदा परिक्रमा करीत असताना त्यांचे पती श्रीपाद पागे यांनी स्वतःच्या मृत्यूची भविष्यवाणी केली होती. त्यांना मृत्यू दिसत होता. नर्मदा किनारी कोटेश्वर मंदिरात त्यांनी प्राण सोडले. पण पतीच्या सांगण्यानुसार मंगळसूत्र, कुंकू पुसले नाही, माझा मृत्यू झाला तरीही रडू नकोस, आपले व्रत सुरू ठेव असे पतीने त्यांना निधनापूर्वी सांगितल्याचे त्या आवर्जून सांगतात. 
——————

मुलांवर चांगले संस्कार करा
विशेष म्हणजे पागेआजी या कोणतीही सिरीयल किंवा टीव्ही पाहत नाहीत. त्या केवळ साधा मोबाईल वापरतात. स्त्रियांनी एकमेकांचा आदर करावा निंदा नालस्ती करू नये. आपल्या मुलांवर चांगले संस्कार घडवावेत.  मोबाईल गेम्स या पासून मुलांना दूर ठेवावे. शुभंकरोती,रामरक्षा, श्री मारुती स्तोत्र  दररोज सकाळ, संध्याकाळी आपल्या मुलांकडून म्हणून घ्यावेत असा सल्ला देखील महिलांना आवर्जून त्या देतात.

Post Views: 25
Previous Post

शिवसेना उबाठाच्या पदाधिकार्‍यांमधील वाद चव्हाट्यावर, शिवसेना नेते खैरे यांनी सुनावले

Next Post

विकसित महाराष्ट्र – २०४७ व्हिजन डॉक्युमेंटला मंत्रिमंडळाची मंजुरी 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

विकसित महाराष्ट्र - २०४७ व्हिजन डॉक्युमेंटला मंत्रिमंडळाची मंजुरी 

ताज्या बातम्या

शिवसेनेचे अमोल शिंदे आणि काँग्रेसचे चेतन नरोटे यांना केले एक दिवसाचे निलंबित

April 20, 2026

सोलापूरच्या खेळाडूंना प्रिसिजनचे बळ

April 20, 2026

दहिगावच्या सुरडकर कुटुंबाची पाचवी पिढी जपत आहे ही परंपरा

April 20, 2026

सुखी जीवनासाठी संयम हीच खरी गुरुकिल्ली – मुनीश्री वीरसागर महाराज

April 20, 2026

मंठा येथे माझं गाव आरोग्य संपन्न गाव कार्यशाळा संपन्न

April 20, 2026

विचार नसलेल्या व्यक्ती समाज माध्यमात व्यक्त होत असल्याने सामाजिक प्रदूषण वाढले – प्रा. कळमकर

April 20, 2026

शिवसेनेचे अमोल शिंदे आणि काँग्रेसचे चेतन नरोटे यांना केले एक दिवसाचे निलंबित

April 20, 2026

लिंगायत स्मशानभूमी आणि पाणीपुरवठा योजनेबाबत पहा काय म्हणाले पालकमंत्री गोरे #public #marathinews

April 20, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0820994

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697