अक्कलकोट – संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या तथा डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या अवकलकोट शहर प्रमुख या पदी बसवराज आळ्ळोळी यांची निवड करण्यात आली आहे.
शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून आपण गोर-गरीब, गरजू आणि आर्थिक दुर्बल घटकांतील रुग्णांना धर्मादाय रुग्णालयांत (१०% ) राखीव खाटा उपलब्ध करुन देणे, निकषात बसत असलेल्या गरीब रुग्णांवर पुर्णत: मोफत . सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करण्या संदर्भातील मदत तसेच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत नोंदणी असलेल्या रुग्णालयांमध्ये गरजू रुग्णांना मोफत शस्त्रक्रिया करणे संदर्भात योग्य मार्गदर्शनासाठी सदैव तत्पर रहावे. गंभीर व महागड्या शस्त्रक्रिया करावयाच्या असलेल्या गोरगरीब-गरजू रुग्णांना भरीव प्रमाणात अर्थ सहाय्य व्हावे या
करीता पंतप्रधान वैद्यकीय सहाय्यता निधी, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, श्री. सिध्दिविनायक गणपती मंदीर ट्रस्ट, सर रतन टाटा ट्रस्ट यांसारख्या विविध ट्रस्टच्या माध्यमातून मदत मिळवून देण्यासाठी थेट बाळासाहेब भवन येथील मुख्य कार्यालयास संपर्क साधावा . जन आरोग्य सेवेसाठी याकरिता आपण योगदान द्यावे असे नियुक्ती पत्रामध्ये आवाहन करण्यात आले आहे .




















