सोलापूर – शिवसेना सोलापूर शहर-जिल्हा कार्यालय येथे मोफत महासेवा शिबिराचे शुभारंभ गुरूवारी छत्रपती शिवाजी महाराज, हिंदु हृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर स्व.आनंद दिघेसाहेब, स्व.बाळासाहेब शिंदे, स्व.शिवाजीराव पिसे, यांच्या प्रतिमेचे पूजन करून सुरुवात करण्यात आली.
शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील शिवसेना जिल्हा शहर संपर्क कार्यालय येथे 11 ते 14 डिसेंबर रोजी सकाळी 10:30 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत नवीन मतदारा नोंदणी व दुरुस्ती, उज्वला गॅस योजना, ई – श्रम कार्ड योजना, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना के.वाय.सी, आयुष्यमान भारत कार्ड, प्रधानमंत्री स्वनिधी योजना, बांधकाम कामगार नोंदणी, रेशन कार्ड दुरुस्ती, आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती, ज्येष्ठ नागरिक कार्ड व पॅन कार्ड असे मोफत महासेवा शिबिर शुभारंभ करण्यात आला.
शहर परिसरातील असंख्य नागरिकांनी व माता-भगिनींनी महासेवेचा लाभ घेतला. या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी संबंधित कागदपत्रे येताना घेऊन यावेत व जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी केले.
याप्रसंगी अनिकेत पिसे, तुकाराम मस्के, प्रकाश अवस्थी, युवानेते सागर पिसे, राजकुमार शिंदे, शशिकांत शिंदे, अक्षय बिद्री, राहुल गुरव, विकास गायकवाड यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.


















