अक्कलकोट – गणपती बाप्पा मोरया, हर हर महादेव, श्री स्वामी महाराज की जय असे विविध जयघोष करीत सुभाष गल्ली अक्कलकोट येथील श्री रिद्धी – सिद्धी गणेश मंदिर येथे श्री गणेश जन्मोत्सव निमित्य रक्तदान शिबीर महाप्रसाद पाळणा कार्यक्र मोठया जल्लोषात करण्यात आला.
प्रति वर्षाप्रमाणे यंदाही म.नि.प्र. श्री बसवंलिंग महाराज यांच्या दिव्य सानिध्यात श्री रिद्धी – सिद्धी गणेश मंदिर समाजसेवी संस्था अध्यक्ष मल्लिनाथ साखरे, उपाध्यक्ष प्रकाश बसवणप्पा किलजे, सचिव शिवपुत्र गिरेच्या हळगोदे, सहसचिव दयानंद शरणप्या बिडवे,खजिनदार राजेंद्र भुंजगे सुभाष गल्ली,रिद्धी सिद्धी गणेश मंदिर, जय हिंद मित्र मंडळ, श्री रिद्धी सिद्धी प्रतिष्ठान यांच्या वतीने गेल्या पंचवीस वर्षापासून श्री गणेश जन्मोत्सव कार्यक्रम मोठया उत्सहात आयोजित केला जातो.
गुरुवार, दि. २२ जानेवारी २०२६ रोजी पहाटे” श्री ” च्या मुर्तीस महाअभिषेक सकाळी १० वाजता भजन सत्संग महिला भजनी कार्यक्रम, दुपारी १२ वाजता पाळणा व गुलाल कार्यक्रम दुपारी १२ ते ५ पर्यंत सुमारे तीन हजार भक्तांनी महाप्रसाद घेतले.सुमारे ७९ जणांनी रक्तदान केले आहे.
यावेळी श्रीमंत मालोजीराजे भोसले, नगराध्यक्ष मिलनदादा कल्याणशेट्टी उपनगराध्यक्ष बंटी राठोड,श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले माजी नगरध्यक्ष बसलिंगप्पा खेडगी, प्रथमेश इंगळे,नगरसेवक नागराज कुंभार, लक्ष्मीकांत धनशेट्टी, महेश हीडोळेसह नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवक यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मंडळाचे संचालक, गुरुनाथ पोतदार, प्रशांत शिंपी,सुशिल किलजे, दयानंद रोडगे, राजेंद्र व महेश लोकापुरे, प्रभुलिंग हळगोदे, अनिल लोकापुरे, बसवराज धरणे,प्रकाश थंब, राजशेखर भरडे चनमलप्पा पट्टद, कु.मल्लम्मा पसारे राजशेखर कलबुर्गी, राचय्या शि. हळगुणकी,कु. शिवकांता पसारे,श्रीमती प्रभावती लोकापुरे आदी प्रमुख उपस्थित होते.सदर कार्यक्रम यशस्वीसाठी अनिल वेदपाठक, अरुण पोतदार, महेश कलबुर्गी, प्रशांत थंब (p k) संतोष पराने, गुरुनाथ पट्टद, सुरेश येळसंगे, संजय लोकांपुरे, प्रशांत शिंपी,शिवशंकर भूषणुरे आदिनी परिश्रम घेतले.

























