सोलापूर – रेल्वे प्रवासादरम्यान जर कुठली गंभीर घटना घडली. जसे की हॉट एक्सेलमुळे लागलेली आग, ब्रेक बिघाडी किंवा चाकामध्ये ठिणगी पडल्या तर त्याचे चित्रीकरण सीसीटीव्ही कॅमेरामध्ये टिपले जाईल. हे फुटेज पुढील चौकशीत महत्त्वाचा पुरावा म्हणून वापरले जाणार आहे रेल्वेच्या प्रत्येक फेरीत सुरक्षेचा दर्जा वाढविण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरतोय असे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
सोलापूरातून रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवासांचा प्रवास आणखीन सुरक्षित होण्यासाठी स्थानकावरील आठ हटमध्ये प्रत्येकी दोन असे सोळा सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या माध्यमातून रेल्वेच्या चाकांपासून ते ब्रेक सिस्टीम पर्यंत प्रत्येक हालचालीवर सीसीटीव्ही मधून बारकाईने लक्ष असणार आहे. रेल्वे गाडी स्थानकात येताना किंवा बाहेर जाताना हटमध्ये बसलेले कर्मचारी या कॅमेराद्वारे गाडीच्या खालील भागावर सतत नजर ठेवतात. चाकामध्ये काही तुटलेले पार्ट ब्रेक बाइंडिंग, हँगिंग पार्ट किंवा हॉट एक्सेलमुळे निर्माण होणारी आग अशा घटकांवर तत्काळ लक्ष जाण्याची सोय या कॅमेरा मुळे झाली आहे. यामुळे रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित आधुनिक आणि विश्वासार्ह होणार आहे.
यासोबतच हटमध्ये तैनात कर्मचाऱ्यांना थर्मामीटर गण देण्यात आली आहे. या उपकरणाद्वारे ते रेल्वेच्या एक्सेल बॉक्सचे तापमान मोजतात. ज्यामुळे चाकणमध्ये असामान्य उष्णता निर्माण होत असल्यास ती त्वरित ओळखता येते. ही अगोदरच दिलेली चेतावणी असल्याने मोठ्या दुर्घटना टाळता येण्यास मदत होणार आहे.
सोलापूर रेल्वे स्थानकात आठ ठिकाणी असणाऱ्या हटमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. यामुळे कोणतीही आपत्कालीन परिस्थिती वेळेवर समजणार आहे. तसेच कर्मचाऱ्यांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून 24 तास नियंत्रण रेल्वे गाड्यांवर लक्ष असेल. यामुळे संभाव्य होणारा अपघात कळतील.
– योगेश पाटील वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक सोलापूर


















