उमरी / नांदेड – सध्या नगर परिषद, जिल्हा परिषद व पंचायत समिती यांची सार्वत्रिक निवडणूक अनुषंगाने उमरी पोलिस स्टेशन च्या वतीने उमरी शहरातील मर्कज मशीद येथे पोलिस निरीक्षक जयप्रकाश गुट्टे यांच्या उपस्थितीत मुस्लिम समाजाची बैठक घेण्यात आली.
यावेळी पोलिस निरिक्षक गुट्टे यांनी निवडणूकीच्या काळात कायदा व सुव्यवस्था आबादीत राहावी याची दक्षता नागरिकांनी घ्यावी शहर निवडणूक काळात कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडणार याची खबरदारी नागरिकांनी घ्यावी तसेच गावात छोटया कारणाने तणाव निर्माण होऊ नये याची दक्षता नागरिकानी घ्यावी युवक तरुणांनी नागरीकानी निवडणूक विभाग व पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे.
सोशल मीडियाचा वापर अत्यंत काळजीपूर्वक करावा,सोशल मीडियावरील status वरून इतरांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
२)आक्षेपार्ह चुकीचे मेसेज पाठवू नये.
३)विरोधकांचे घरासमोर विनाकारण घोषणा देऊ नये.
४)रात्री १० नंतर कोणीही विनाकारण घराबाहेर पडू नये.
५)कोणीही आदर्श आचारसंहितेचा कोणीही भंग करू नये.
६)शांततेत निवडणूक पार पाडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे व इतर सुचना दिल्या आहेत.
कोणीही जातीय तेढ निर्माण करणारे पोस्ट अशी माहीती मुस्लिम समाजा सोबत घेण्यात आलेल्या बैठकीत पोलीस ठाण्याचे नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक जयप्रकाश गुट्टे यांनी बैठकीत केले याबैठकीत माजी नगरसेवक ऐजाज खान, मशीदचे सदर सय्यद फारुख, शेख रशीद सेठ, माजी नगरसेवक बाबुबेग रतन खदारे,मुसासेठ, अहेमद बेग, हाजी सज्जन सेठएम आय एमचे सय्यद इलियास, शादुर सेठ, शेख जमील, यावर पटेल, मशीदचे मौलाना उपस्थित होते





















