पंढरपूर – येथील एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागात “प्रॅक्टिकल स्किल्स इन इलेक्ट्रॉनिक मेजरमेंट अँड एम्बेडेड प्लॅटफॉर्म्स” या विषयावर दि. ०१ जानेवारी ते ०६ जानेवारी २०२६ या कालावधीत व्हॅल्यू अॅडिशन प्रोग्राम यशस्वीपणे संपन्न झाला.
“विद्यार्थ्यांना आधुनिक इलेक्ट्रॉनिक मोजमाप तंत्रे व एम्बेडेड प्लॅटफॉर्म्सच्या साहाय्याने प्रत्यक्ष प्रयोगांचा अनुभव देत त्यांची व्यावहारिक कौशल्ये विकसित करणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा तांत्रिक दृष्टिकोन अधिक व्यापक होत असून, उद्योगजगताच्या गरजा व संशोधन क्षेत्रातील अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ते अधिक सक्षम आणि आत्मविश्वासपूर्ण बनत आहेत. भविष्यातील करिअरसाठी आवश्यक असलेली कौशल्यसंपन्नता घडविण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम निश्चितच उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक मोजमाप तंत्रे व एम्बेडेड प्लॅटफॉर्म्स संदर्भातील प्रत्यक्ष प्रायोगिक कौशल्ये विकसित करणे हा होता. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा तांत्रिक विकास होऊन ते औद्योगिक व संशोधन क्षेत्रासाठी अधिक सक्षम होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी सचिन गुणे, प्रा.अंजली पिसे, प्रा.अविनाश हराळे, प्रा.अनिता शिंदे, प्रा.राहुल घोडके, प्रा. माधव नाईकनवरे व प्रा. वैष्णवी उत्पात यांनी संसाधन व्यक्ती( रिसोर्स पर्सन) म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी इलेक्ट्रॉनिक मोजमाप तंत्रे, एम्बेडेड सिस्टिम्स, हार्डवेअर इंटरफेसिंग तसेच प्रत्यक्ष प्रयोगांच्या माध्यमातून विषय सुलभ व प्रभावीपणे स्पष्ट केला.
या उपक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे व उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.
या कार्यक्रमात द्वितीय वर्षातील ६५ हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रायोगिक अनुभव मिळाल्याने त्यांचा आत्मविश्वास व तांत्रिक कौशल्ये अधिक वृद्धिंगत झाली. या व्हॅल्यू अॅडिशन प्रोग्रामचे समन्वयक प्रा.अविनाश हराळे यांनी जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. विभागप्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी यांनी कार्यक्रमासाठी मोलाचे मार्गदर्शन केले व समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा.स्वप्नील टाकले, प्रा.महेश झाडे, प्रा.अमृता माळी, आशिष येडगे व श्रीमती अश्विनी राऊत यांनी सदस्य म्हणून महत्त्वपूर्ण योगदान दिले.
तसेच महाविद्यालयातील शिक्षकवृंद व विद्यार्थी प्रतिनिधींनीही सहकार्य केले.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी आयोजकांनी समाधान व्यक्त करत, या कार्यक्रमातून मिळालेले ज्ञान विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीत निश्चितच उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

















