सोलापूर – महाराष्ट्र राज्य सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी विकास परिषदेचे अध्यक्ष सदाशिव बेडगे यांच्या नेतृत्वात व सौ अनुराधा बेडगे यांनी मोर्चात सहभागी झालेल्या ची काळजी घेत मोर्चा शिस्तप्रिय, शांतता व सुव्यवस्था अबाधित राखून यशस्वीपणे पार पडला त्याबद्दल सोलापूर जिल्हा अध्यक्ष सिद्राम मुद्देबिहाळ व पदाधिकारी यांनी मंत्रीचंडक कै शांताबाई मुद्देबिहाळ सार्वजनिक वाचनालयात कार्यक्रमाचे अध्यक्ष निवृत्त जिल्हा सत्र न्यायाधीश ज्ञानेश्वर भरगडे यांच्या हस्ते शाल श्रीफळ,शाल,पेढे भरवून सपत्नीक सन्मान केला . सुरुवातीला एस आर.रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन निवृत्त जिल्हा सत्र न्यायाधीश ज्ञानेश्वर भरगडे यांच्या हस्ते पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी सन्मान उत्तर देताना सदाशिव बेडगे म्हणाले की आपण जो माझ्यावर विश्वास दाखवला आणि मी दिलेल्या हाकेला भरभरून प्रतिसाद दिला विशेष म्हणजे महिला भगिनी सहभागी झाले हा एक ५८ वर्षातील ऐतिहासिक मोर्चा झाला महाराष्ट्रातील सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी विकास परिषदेचे पदाधिकारी यांनी मोर्चा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले त्यामुळे आपण यशस्वी झालोअसे बेडगे म्हणाले.
अध्यक्षीय भाषणात भरगंडे म्हणाले की,जो दुसऱ्यांचा विचार करून समाजासाठी कार्य करतो त्यांचा सन्मान झाला पाहिजे माझ्या हातून सदाशिव बेडगे व सौ.अनुराधा बेडगे यांचा सन्मान होत आहे खरोखरच मला आनंद वाटतो जो दुसऱ्यांसाठी झटतो त्याचा सन्मान होणे गरजेचे आहे.
यावेळी सौ.आश्विनी मुद्देबिहाळ चि.देवांश कोले ,नरसिंह मिसालोलू, रामचंद्र वग्गे, गिरीश मठपती, धोंडिराम जेवूरकर, आदी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरसिंह मिसालोलू यांनी केले तर सर्वाचे आभार धोंडिराम जेवूरकर मानले.
























