सोलापूर – सोहम शिंदे व वैष्णवी परदेशी यांची सोलापूर जिल्हा ज्युनिअर रोल बॉल संघाच्या कर्णधारपदी निवड झाली.
जळगाव येथे सुरू झालेल्या ज्युनिअर राज्य स्पर्धेत हा संघ सहभागी झाला. संघास जिल्हा रोलबॉल संघटनेचे अध्यक्ष दशरथ गुरव, उपाध्यक्ष विठ्ठल कुंभार ,सचिव प्रमोद चुंगे यांनी शुभेच्छा दिल्या. प्रमोद म्हेत्रे यांची संघ व्यवस्थापक म्हणून निवड करण्यात आली.
संघ :मुली : कर्णधार वैष्णवी परदेशी, श्रुष्टी कांबळे, पावनी नंदाल, वंशिका वर्ण, वृषाली पारिक, वेदिका अळंद, वैदही सट्टे, अर्पिता कोळी, प्रणाली पवार, ऋतुजा माने, गौरी हेडे, अक्षता बागलकर, प्रशिक्षक ज्योती शिवशरण.
मुले : कर्णधार सोहम शिंदे, मिनास अदाकी, प्रथमेश बारगंडे, प्रेम व्हटकर, ओंकार कंडारे, ओंकार पास, आर्यन डोंबाळे, सार्थक कांबळे, वीर दोशी, समर्थ सोनवणे, यश सुर्वे, श्लोक खंडेलवाल, प्रशिक्षक शितलकुमार शिंदे.




















