Thursday, April 16, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

विद्यार्थ्यांनो स्वदेशीचा पुरस्कार करा नवराष्ट्राची निर्मिती होईल – उमाकांत चनशेट्टी

तरुण भारतbyतरुण भारत
November 9, 2025
in marathwada
0
0
SHARES
11
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अक्कलकोट – अद्ययावत तंत्रज्ञानामुळे स्वदेशी वस्तूंची मोठ्या प्रमाणात निर्मिती झाली आहे, म्हणून विद्यार्थ्यांनी स्वदेशी वस्तु खरेदीस प्राधान्य द्यावे, त्यामुळे देशाचा जागतिक स्तरावर नवराष्ट्र म्हणून नावलौकिक होईल असे प्रतिपादन प्राचार्य डॉ उमाकांत चनशेट्टी यांनी व्यक्त केले.

महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्था संचलित मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने विद्यार्थी दिन व वंदेमातरम गीत लेखनास 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे जेष्ठ संचालक मल्लिनाथ कल्याणशेट्टी होते. व्यासपीठावर प्राचार्य डॉ राजेंद्रसिंह लोखंडे, मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी उपस्थित होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की, देशहितासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच सामाजिक जाण विकसित केली पाहिजे, आत्मविश्वासाच्या बळावर जीवनावश्यक स्वदेशी वस्तू निर्मितीचे तंत्र अवगत केले पाहिजे, स्वदेशीचा प्रचार समाजामध्ये करून देशाच्या आर्थिक विकासामध्ये योगदान दिले पाहिजे.

मल्लिनाथ कल्याणशेट्टी म्हणाले की, विद्यार्थी हेच देशाचे भावी नागरिक आहेत. तंत्रज्ञान विज्ञान व नव संशोधनामुळे विद्यार्थ्यांची प्रगती झाली आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी देखील देश विकासासाठी नवनवीन संकल्प केले पाहिजेत. विकसित भारताचे स्वप्न साकार केले पाहिजे.

कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ एस आर लोखंडे यांनी केले, आभार प्रा भीम सोनकांबळे यांनी मानले. कार्यक्रमास कार्यक्रमाधिकारी प्रा राजशेखर पवार, प्रा डॉ शितल झिंगाडे-भस्मे, प्रा हर्षदा गायकवाड, प्रा शिल्पा धूमशेट्टी उपस्थित होते.

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

विद्यार्थी दिनानिमित्त पंचप्पा कल्याणशेट्टी कौशल्य विकास स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार प्राचार्य डॉ उमाकांत चनशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आला.

 विद्यार्थ्यांनी सादर केले वंदेमातरम गीत..

वंदेमातरम गीतास 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सामुदायिक संपूर्ण वंदेमातरम गीत सादर केले, मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

कल्याणशेट्टी महाविद्यालयात विद्यार्थी दिन कार्यक्रम प्रसंगी प्राचार्य डॉ उमाकांत चनशेट्टी व विद्यार्थी.

Post Views: 84
Previous Post

सोहम शिंदे, वैष्णवी परदेशी सोलापूर जिल्हा रोल बॉल संघाचे कर्णधार

Next Post

व्हिएतनामची ‘विनफास्ट’ कंपनी महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहन निर्मिती प्रकल्प उभारण्यास उत्सुक

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

व्हिएतनामची ‘विनफास्ट’ कंपनी महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहन निर्मिती प्रकल्प उभारण्यास उत्सुक

ताज्या बातम्या

झेडपी सदस्यांसाठी एकदिवसीय कार्यशाळा; पाच वर्षांच्या सुयोग्य नियोजनाला मिळणार दिशा

झेडपी सदस्यांसाठी एकदिवसीय कार्यशाळा; पाच वर्षांच्या सुयोग्य नियोजनाला मिळणार दिशा

April 16, 2026
जिव्हाळा मागासवर्गीय संस्थेच्यावतीने डॉ. आंबेडकर जयंती साजरी

जिव्हाळा मागासवर्गीय संस्थेच्यावतीने डॉ. आंबेडकर जयंती साजरी

April 16, 2026
राहिलेले 20 टक्के कागदपत्र स्कॅनिंग करून घ्या 

राहिलेले 20 टक्के कागदपत्र स्कॅनिंग करून घ्या 

April 16, 2026
आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार उघड; उपचाराअभावी ३८ वर्षीय तरुणाचा मृत्यू

आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार उघड; उपचाराअभावी ३८ वर्षीय तरुणाचा मृत्यू

April 16, 2026
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मनपा प्राथमिक शिक्षण मंडळात अभिवादन

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मनपा प्राथमिक शिक्षण मंडळात अभिवादन

April 16, 2026
संभाजी ब्रिगेड कार्यालयात महात्मा ज्योतिराव फुले व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती साजरी

संभाजी ब्रिगेड कार्यालयात महात्मा ज्योतिराव फुले व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती साजरी

April 16, 2026
माजी सरपंच लक्ष्मी सरवदे यांना “शिवस्वराज्य पंढरीरत्न उत्कृष्ट महिला सरपंचरत्न पुरस्कार” जाहीर

माजी सरपंच लक्ष्मी सरवदे यांना “शिवस्वराज्य पंढरीरत्न उत्कृष्ट महिला सरपंचरत्न पुरस्कार” जाहीर

April 16, 2026
पालखी सोहळ्यात वारकरी भाविकांना आवश्यक सुविधा देण्याससोबतच रस्ते दुरुस्ती, स्वच्छतेला प्राधान्य

पालखी सोहळ्यात वारकरी भाविकांना आवश्यक सुविधा देण्याससोबतच रस्ते दुरुस्ती, स्वच्छतेला प्राधान्य

April 16, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0812083

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697