गेल्या दहा वर्षा पासून भाजपात मला अपमानास्पद वागणूक दिली जाते. भाजपाच्या कठीण काळात मी काम केले. भाजपा मधील जिल्ह्याच्या काही नेत्यांच्या दबावामुळे माझ्यावर कायम अन्याय केला जात आहे. त्यामुळेच मी भाजपाला रामराम करून राष्ट्रवादी खा. शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचा गौप्यस्फोट भाजपाचे नेते संजय क्षीरसागर यांनी केला.
दरम्यान पक्ष सोडण्या पूर्वी मी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून त्यांच्या कडे मला कसा त्रास दिला गेला याचे पुरावे ही दिल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या काळात भाजपाला अडचण होऊ शकते.
या संदर्भात अधिक माहिती देताना क्षीरसागर म्हणाले, गेल्या 25 वर्षापासून जनतेने माझ्यावर प्रेम केले. परंतु त्यांना मी काहीच देऊ शकलो नाही. त्यांच्या उपकाराची उतराई मी कशी करणार? भाजपाने आज पर्यंत मला जनतेसाठी कुठलाच निधी दिला नाही. मला भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटण्यासाठी मुंबईत तीन-तीन दिवस मला अपॉइंमेंट मिळू दिली नाही.