▪️पुढील तीन ते चार दिवसात समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार
▪️ही लढत फक्त विशाल पाटील आणि दंडूकशाही करणाऱ्या संजय पाटलांविरोधात; विशाल पाटलांनी दंड थोपटले
▪️कट्टर नक्षलवाद्यास गडचिरोली पोलिसांनी केली अटक, शासनाने केलं होतं 1.5 लाखांचे बक्षीस जाहीर
▪️राजस्थान रॉयल्सचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने आयपीएलमध्ये 200 विकेटचा टप्पा पार केला
▪️मोदी सरकार नव्हे आम्हाला देशात भारत सरकार हवंय; उद्धव ठाकरेंची घणाघाती टीका
▪️लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात 258 उमेदवार रिंगणात, 7 मे रोजी होणार मतदान
▪️सांगलीत बंडखोरी करणाऱ्या विशाल पाटलांवर काँग्रेस करणार कारवाई, नाना पटोले यांनी दिली माहिती
▪️पीएम मोदींविरोधात काँग्रेस अॅक्शन मोडमध्ये, निवडणूक आयोगात दाखल केल्या 17 तक्रारी
▪️सुजय विखेंना दिल्लीला पाठवलं की, अहमदनगरचं नाव ‘अहिल्यानगर’ होणारच : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
▪️2024 च्या लोकसभा निवडणूकीत भाजपने पहिला विजय नोंदवला; सुरत लोकसभेच्या जागेवर भाजप उमेदवार मुकेश दलाल बिनविरोध विजयी
▪️केंद्रीय निवडणूक आयोगाने ओमराजे निंबाळकर आणि अर्चना पाटील यांना आचारसंहिता भंग केल्याचा ठपका ठेवत दोन्ही उमेदवारांना नोटीस धाडली
▪️प्रवाशांची मागणी लक्षात घेता मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! पनवेल-नांदेडदरम्यान 40 स्पेशल समर ट्रेन धावणार
▪️’सूरतला गेल्यावर ठाकरेंकडून मला मुख्यमंत्रिपदाची ऑफर’, एकनाथ शिंदे यांचा मोठा गौप्यस्फोट
▪️अरविंद केजरीवाल यांना धक्का! जामिनावरील जनहित याचिका फेटाळली; 75 हजारांचा ठोठावला दंड
▪️सोलापुरात वंचित बहुजन आघाडीला धक्का; वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला
▪️आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स-निफ्टी, मिडकॅप इंडेक्स 49 हजार पार
▪️मैदानावरील पंचांसोबत वाद घालणं महागात पडलं, विराट कोहलीला बीसीसीआयचा दणका, मॅच फीसच्या 50 टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागणार