जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यातील जवळपास 165 शाळांमध्ये यंदा पहिल्यांदाच सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू करण्याचा महत्त्वाचा निर्णय सीईओ मनीषा आव्हाळे यांनी घेतला. त्यातील सावळेश्वरच्या केंद्र शाळेला त्यांनी आज शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी भेट दिली. सेमी इंग्रजीच्या इयत्ता पहिलीच्या वर्गावर त्यांनी तास घेत चिमुकल्यांना प्रोत्साहित केले.
शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना गोड खाऊ, पुस्तकांचे वाटप करण्यात आले. गणवेशही काही दिवसात मिळतील. दरम्यान, शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी सावळेश्वर (ता. मोहोळ) येथील केंद्र शाळेतील चिमुकल्यांसोबत संवाद साधत त्यांना मार्गदर्शन केले.