बार्शी – कर्मवीर कृषीतंत्र विद्यालय, बार्शी येथे ५ जानेवारी रोजी कृषी तंत्रज्ञान शिक्षण विभागाच्या जिल्हास्तरीय निवड क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. क्रीडा स्पर्धेमध्ये सोलापूर जिल्ह्यातील कृषीतंत्र विद्यालय, सोलापूर, बार्शी, अनगर, बोराळे, गौडगांव, वडाळा, अकलूज, एखतपुर, कडलास अशा एकुण ९ कृषीतंत्र विद्यालयामधून १२५ खेळाडुंनी लांब उडी, कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, रनिंग या क्रीडा प्रकारामध्ये सहभाग नोंदविला होता.
सदर पाच क्रीडा प्रकारामधून विद्यापीठस्तरीय क्रीडा स्पर्धेकरिता एकुण ४५ खेळाडूची निवड निश्चित झाली असून विद्यापीठस्तरीय क्रीडा स्पर्धा म.फु. कृ.वि. राहुरी येथे ३० व ३१ जानेवारी रोजी संपन्न होणार आहेत. विजेता खेळाडूंचा मेडल व सहभाग प्रमाणपत्र देऊन संस्थेचे खजिनदार जे.सी. शितोळे व .कृषीतंत्र विद्यालयाचे प्राचार्य जे.बी. पाटील यांनी गौरव केला.
क्रीडा स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी म.फु.कृ. विद्यापीठाचे सहयोगी अधिष्ठाता (कृषि तंत्रज्ञान) डॉ. प्रशांत बोडके, श्री शि.शि. प्र. मंडळाचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, उपाध्यक्ष एन.एन. जगदाळे, सचिव पी.टी. पाटील, सहसचिव ए.पी. देबडवार, खजिनदार जे.सी. शितोळे यांचे सहकार्य लाभले.
कर्मवीर कृषीतंत्र विद्यालयाचे प्राचार्य गलांडे पी. आर. यांनी सर्व उपस्थित प्राचार्य, पंच व क्रीडा शिक्षकांचे तसेच सर्व खेळाडू, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे आभार मानले.


















