लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला आज १९ एप्रिलपासून सुरुवात झाली आहे. लोक मोठ्या संख्येने मतदान करत आहेत. अशातच दाक्षिणात्य कलाकारांनी देखील मतदान केले आहे. दाक्षिणात्य कलाकार मतदान केंद्रावर पोहोचून मतदान करत आहेत. या यादीत मेगास्टार रजनीकांत, अजित कुमार, विजय सेतूपती, कमल हसन, धनुष्य या सारख्या अनेक दिग्गज कलाकारांचा समावेश आहे.
कमल हसन आणि धनुष्य यांनी चेन्नई येथे मतदान केले. तर, अजित कुमार यांनी थिरुवानमियूर येथे जाऊन मतदान केले. या कलाकारांनी मतदान करून सोशल मीडियावर फोटो देखील अपलोड केले आहेत. आम्ही मतदान केले, तुम्ही पण मतदान करा, असे आवाहनदेखील कलाकारांनी आपल्या चाहत्यांना केले आहे.